बाईईई…! सलग तिसऱ्या दिवशी सोने दरात वाढ, आजचे भाव वाचून भुवया उंचावतील

डिसेंबर 24, 2025 11:53 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ डिसेंबर २०२५ । आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपासून ते स्थानिक बाजारपेठेपर्यंत, सोने आणि चांदीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. सोने आणि चांदीच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहे. दरम्यान, या आठवड्यातील सलग तिसऱ्या दिवशी सोने दरात वाढ झाली आहे. आज बुधवारी सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ३८० रुपयांनी वाढले असून यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला फटका बसला आहे.

gold silver 2 jpg webp

सोमवार, मंगळवारीपाठोपाठ बुधवारी सकाळच्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ३८० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,३८,९३० रुपये झाले आहेत. तर ८ ग्रॅमचे दर ३०४ रुपयांनी वाढले असून १,११,१४४ रुपये झाले आहेत.आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ३५० रुपयांनी महागले आहेत. हे दर १,२७,३५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर २८० रुपयांनी वाढले आहेत हे दर १,०१,८८० रुपये झाले आहेत.

जळगावात भाव काय?
जळगाव सराफ बाजारात सोमवारपाठोपाठ मंगळवारी सोने तोळ्यामागे २२६६ रुपयांनी वाढून १,४०,२८६ रुपये तोळ्यावर पोहोचले. तर चांदी ६४८९ रुपयांनी वाढल्याने प्रतिकिलो २,२१,७५९ रु. वर पोहोचली. हा सोन्यासह चांदीचा सर्वकालीन उच्चांकी दर ठरला आहे.

दरवाढीचे कारण काय?

नुकताच यूएस फेडरल बँकेचा डेटा जाहीर झाला. त्यापाठोपाठ जपान बँकेचाही डेटा खराब असल्याचे अहवाल आले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात पॅनिक वातावरण निर्माण झाल्याने खरेदी वाढल्याचे व्यापारी आकाश भंगाळे यांनी सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now