BSF मध्ये बंपर भरती जाहीर; 10वी पास तरुणांना मोठी संधी

डिसेंबर 22, 2025 4:36 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । देशसेवा करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. सीमा सुरक्षा दलामध्ये (BSF) कॉन्स्टेबल GD (खेळाडू- Sports Quota) पदासाठी नोकरभरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष दहावी पास तरुणांना नोकरीची संधी आहे BSF Recruitment 2026

bsf jpg webp

या भरतीद्वारे एकूण 549 जागा भरल्या जाणार असून इच्छुक उमेदवार 27 डिसेंबरपासून या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2026 पर्यंत असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने नोकर भरती होणार असून 15 जानेवारी 2026 रोजी इच्छुक उमेदवार रात्री 11:59 वाजेपर्यंत अर्ज करु शकणार आहेत. BSF Bharti 2026

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कॉन्स्टेबल GD (खेळाडू)549
Total549

शैक्षणिक पात्रता : इच्छुक उमेदवार 10वी उत्तीर्ण आणि संबंधित खेळात पात्र असावा. त्या खेळाचे उमेदवाराला ज्ञान असावं. कोणकोणत्या खेळाचे ज्ञान आवश्य आहे, याची माहिती उमेदवारांना जाहिरातीत मिळेल
वयाची अट: 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
परीक्षा शुल्क :
खुल्या प्रवर्गासाठी आणि इतर मागासवर्गातील उमेदवारांसाठी 159 रूपये इतकी फी असणार आहे. तर, अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना आणि महिला उमेदवारांना फी भरायची नाही. त्यांच्यासाठी मोफत आहे.

इतका पगार मिळणार?
निवड झालेल्या उमेदवारांना लेव्हल 3 प्रमाणे मासिक वेतन मिळेल. 21,700 ते 69,100 पर्यंत मासिक वेतन असेल. शिवाय यांना केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना नियमानुसार पगार आणि इतर भत्ते मिळणार आहे.

जाहिरात (PDF)Click Here 
Online अर्ज [Starting: 27 डिसेंबर 2025] Apply Online

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now