आनंदाची बातमी! ‘या’ 5 बँकांनी व्याजदरात केली मोठी कपात, कर्जावरील EMI कमी होणार

डिसेंबर 9, 2025 1:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दरात कपात केली. आरबीआयने रेपो रेट ०.२५ बेसिस पॉइंट्सने कमी केल्यामुळे रेपो रेट ५.५०% वरून ५.२५ टक्के झाला आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर ५ मोठ्या बँकांनी आपल्या कर्जाच्या व्याजदरात मोठी कपात केली आहे. याचा अर्थ आता विशिष्ट कर्ज स्वस्त होणार आहेत. यात बँक ऑफ बडोदापासून बँक ऑफ महाराष्ट्रापर्यंतच्या मोठ्या बँकांचा समावेश आहे.

loan

आरबीआयने रेपो रेट कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर याचा फायदा आपल्या ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी बँकांनी देखील आपल्या कर्जाच्या व्याजदरात कपार केली आहे.

या बँकांनी व्याजदरात केली कपात

बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ इंडियाने RBLR मध्ये २५ बेसिस पॉइंट्सने कपात केली आहे. यामुळे व्याजदर ८.३५ टक्क्यांवरुन ८.१० टक्के झाले आहे.

इंडियन बँक
इंडियन बँकेने RBLR मध्ये कपात केली आहे. यामुळे व्याज ८.२० टक्क्यांवरुन ७.५९ टक्के झाली आहे.याचसोबत एमसीएलआरमध्येही ५ बेसिस पॉइंट्सने कपात केली आहे.

बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ बडोडाने बेस्ड लेंडिंग रेट्समध्ये २५ बेसिस पॉइंट्सने कपात केली आहे. यामुळे हे दर ८.१५ वरुन ७.९० झाले आहे.

करुर व्यास बँक
या बँकेनेदेखील एमसीएलआरमध्ये कपात केली आहे. बँकेने एमसीएलआर १० बेसिस पॉइंट्सने कमी केले असून ते ९.४५ झाले आहेत.

बँक ऑफ महाराष्ट्र
बँक ऑफ महाराष्ट्रने रेपो लिंक्ड रेटमध्ये २५ बेसिस पॉइंट्सने कपात केली आहे. यामध्ये होम लोन ७.१० टक्के झाला आहे. तर कार लोन ७.४५ आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now