जळगाव लाईव्ह न्यूज । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही खास बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) गट अ, ब आणि क मधील विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे आणि २२ डिसेंबर २०२५ या अंतिम मुदतीपर्यंत अर्ज करता येणार आहे. CBSE Bharti 2025

पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट www.cbse.gov.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज भरू शकतात. इतर कोणत्याही माध्यमातून प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. CBSE Recruitment 2025

कोणती पदे भरली जाणार?
1) असिस्टंट सेक्रेटरी – 08
2) असिस्टंट प्रोफेसर अॅण्ड असिस्टंट डायरेक्टर (अकॅडेमिक्स) – 12
3) असिस्टंट प्रोफेसर अॅण्ड असिस्टंट डायरेक्टर (ट्रेनिंग)- 08
4) असिस्टंट प्रोफेसर अॅण्ड असिस्टंट डायरेक्टर (स्किल एज्युकेशन) – 07
5) अकाउंट्स ऑफिसर – 02
6) सुपरिंटेंडंट – 27
7) ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर- 09
8) ज्युनियर अकाउंटंट- 16
9) ज्युनियर असिस्टंट – 35
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: पदवीधर
पद क्र.2: 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
पद क्र.3: 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
पद क्र.4: 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
पद क्र.5: अर्थशास्त्र/ वाणिज्य/ लेखा/ वित्त/ व्यवसाय अभ्यास/ खर्च लेखा विषयासह पदवी
पद क्र.6: (i) पदवीधर (ii) Windows, MS-Office, मोठ्या डेटाबेसची हाताळणी, इंटरनेट यासारख्या संगणक/कॉम्प्युटर अनुप्रयोगांचे कार्य ज्ञान.
पद क्र.7: (i) इंग्रजी सह हिंदी पदवी (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा किंवा 03 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) 12वी उत्तीर्ण (Accountancy/ Business Studies/ Economics/ Commerce/ Entrepreneurship/Finance/Business Administration/ Taxation/Cost Accounting) (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि
पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि
वयाची मर्यादा : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 22 डिसेंबर 2025 रोजी, 18 ते 35 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : [SC/ST/PWD/ExSM/महिला: ₹250/]
पद क्र.1 ते 5: General/OBC/EWS: ₹1750/-
पद क्र.6 ते 9: General/OBC/EWS: ₹1050/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज कसा करावा?
सर्वात आधी तुम्हाला cbse.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर होमपेजवर तुम्हाला भरतीसंबंधित लिंक दिसणार आहे. त्यावर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे. यानंतर लॉग इन करावे.
यानंतर तुम्हाला फॉर्ममध्ये सर्व माहिती भरायची आहे.
यानंतर फॉर्म सबमिट करावी. या फॉर्मची एक प्रिंट आउट तुमच्याजवळ ठेवा.












