जळगाव लाईव्ह न्यूज । ६ डिसेंबर २०२५ । सोने आणि चांदी दरात सातत्याने चढ-उतार सुरु असून आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. पण चांदीचे दर मात्र वाढले आहेत. आज सोन्यात ५४० रुपयांची घसरण झाली. तर चांदी दरात तब्बल ३००० रुपयांची वाढ झाली. एकीकडे लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. आज सोन्यात घसरण झाली असली तरी अद्यापही भाव सर्वसामान्यांच्या आवक्याबाहेर आहेत.

सोन्याचा दर
आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ५४० रुपयांनी घट झाली आहे. यांनतर २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,३०,१५० रुपये खर्च करावे लागणार आहेत. आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ५०० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,१९,३०० रुपये खर्च करावे लागणार आहे.

चांदीचा दर
एकीकडे सोन्याच्या दरात घसरण झाली तर दुसरीकडे चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आज चांदी खरेदी करताना तुमच्या खिशावर ताण येणार आहे. आज १ किलो चांदीच्या दरामध्ये तब्बल ३,००० रुपयांनी वाढ झाली आहे. ही चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला १,९०,००० रुपये खर्च करावे लागणार आहे.












