जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी निर्माण झाली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) चे एक युनिट असलेल्या सेंटर फॉर पर्सोनेल टॅलेंट मॅनेजमेंट (CEPTAM)मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.

वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक B आणि तंत्रज्ञ A साठी भरती केली जाणार आहे. एकूण ७६४ पदे भरली जाणार असून या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ९ डिसेंबर २०२५ पासून सुरु होणार आहे. त्यानुसार उमेदवार अधिकृत वेबसाइट drdo.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात.

कोण अर्ज करू शकतो?
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक बी पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून सायन्समध्ये पदवी प्राप्त केलेली असावी.इंजिनियरिंग, टेक्निकल आणि कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत केमिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये डिप्लोमा प्राप्त केलेला असावा. १८ ते २८ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
इतका पगार मिळेल?
डीआरडीओमधील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणीद्वारे होणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला पदानुसार १९,९०० ते १,१२,४०० रुपये पगार मिळणार आहे.
अर्ज कसा करावा?
सर्वात आधी तुम्हाला drdo.gov.in वर जायचे आहे.
यानंतर तुम्हाला CEPTAM ११ वर तुम्हाला जाऊन लिंकवर क्लिक करावे लागेल.
यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करुन लॉग इन करायचे आहे.
यानंतर तुमचे नाव, जन्मतारीख ही सर्व माहिती भरायची आहे. फोटो आणि सही अपलोड करा.
यानंतर फॉर्म सबमिट करण्यापूर्वी प्रिंट आउट काढून ठेवा.












