ऐन लग्नसराईत सोने-चांदीच्या किमतीने फोडला ग्राहकांना घाम ; जळगावमध्ये मोठी वाढ

नोव्हेंबर 28, 2025 4:52 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२५ । गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर हे वर खाली होत आहे. लग्नसराईचे दिवस सुरु असल्याने ग्राहकांचे लक्ष दोन्ही धातूंकडे आहे. पण अचानक पुन्हा एकदा सोने चांदीच्या दरात वाढ होत असल्याचे चित्र आहे. जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत आज शुक्रवारी सोने दरात मोठी वाढ दिसून आली. सोबतच चांदी देखील वधारली आहे.यामुळे लग्नसराईसाठी दागिने बनविणाऱ्या ग्राहकांना घाम फुटला आहे.

gold rate 2

सध्या सोने-चांदीच्या किंमतीत ही वाढ यासाठी दिसत आहे कारण डिसेंबरमध्ये अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात पुन्हा एकदा कपात होण्याची शक्यता वाढली आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये सेफ-हेव्हन मालमत्तेची (सुरक्षित गुंतवणूक) मागणी वाढली आहे. त्याचबरोबर देशांतर्गत लग्नसराईचा हंगाम सुरु असल्यानं वाढत्या मागणीमुळे देखील दोन्ही धातूंच्या दरात वाढ होताना दिसत आहे.

काय आहे सोन्या-चांदीचा भाव?

जळगाव सराफ बाजारात शुक्रवारी सकाळी बाजार उघडल्यावर सोने दरात ६१८ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोने तीन टक्के जीएसटीसह एक लाख ३० हजार ६०४ रूपयांपर्यंत वधारले. तर चांदीमध्ये १०३० रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदी जीएसटीसह प्रति किलो एक लाख ७२ हजार १० रूपयांपर्यंत पोहोचली.

सुवर्ण व्यावसायिकांच्या मते, आगामी काळात सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता आहे. फेडरल रिझर्व्हने प्रत्यक्षात व्याजदर कपात केली तर सोन्याच्या किमतींमध्ये आणखी एक जोरदार तेजी दिसू शकते. दरम्यान, चांदी ग्राहकांना सध्या उत्तम परतावा देत असून, औद्योगिक वापर वाढत असल्याने येत्या काळात चांदीची मागणी आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. यामुळे, दीर्घकालीन गुंतवणुकदारांनी या दोन्ही धातूंमध्ये गुंतवणूक करताना संतुलित आणि विचारपूर्वक रणनीती आखल्यास लक्षणीय नफा कमावण्याची संधी निर्माण होऊ शकते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now