जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२५ । सोने आणि चांदी दरात चढ उतार सुरु असून आज सोने दरात वाढ झालीय. २४ कॅरेट सोन्याची प्रति तोळा किंमत २२० रुपयांनी वाढली आहे. दुसरीकडे चांदी दरात आज मोठी घसरण झालीय. आज चांदी दरात प्रति किलो ४००० रुपयाची घसरण झाली.

दिवाळीनंतर सध्या सर्वत्र लग्नसराईचा मोसम सुरू झाला आहे. या दरम्यान,सोन्याची मागणी वाढण्याची दाट शक्यता आहे. या वाढलेल्या मागणीचा सोन्याच्या भावाला आधार मिळेल. यामुळे, सध्या किंमतीत दबाव जाणवत असला तरी पुढील काही आठवड्यांत सोन्याचा दर पुन्हा वाढीस लागून अंदाजे १.३० लाखांच्या पातळीला स्पर्श करू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आज २४ कॅरेट सोने दरात २२० रुपयाची वाढ होऊन प्रति १० ग्रॅम १,२४,४८० रुपयावर पोहोचले आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर २०० रुपयांनी वाढून १,१४,१०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला. दुसरीकडे चांदी दरात ४००० रुपयाची घसरण झाली. यांनतर एक किलो चांदीचा दर १,६१,००० रुपयावर पोहोचला.












