जळगाव सुवर्णपेठेत दोन दिवसाच्या घसरणीनंतर सोने-चांदीत मोठी उसळी, नवीन दर पहा..

नोव्हेंबर 19, 2025 12:05 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२५ । जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत चढउतार दिसत असून सलग दोन दिवसाच्या घसरणीनंतर आज बुधवारी दोन्ही धातूंच्या किमतीत मोठी उसळी दिसून आली. ऐन लग्न सराईच्या दिवसात सोन्याचे दर वाढल्यानं खरेदी ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

gold silver 2 jpg webp

जळगाव सराफ बाजारात या आठवड्याच्या सोमवारी आणि मंगळवारी सोन्यात घसरण दिसून आली. १८ नोव्हेंबर रोजी मंगळवारी १० ग्रॅम सोने ७२१ रुपयांनी घसरले होते. यानंतर सोन्याचा एक तोळ्याचा भाव १,२५,९६९ रुपयांवर आला होता. तर ३०९० रुपयांनी घसरून १,५९,६५० रुपये किलोवर पोहोचली होती. मात्र आज सोन्यासह चांदी दरात मोठी वाढ दिसून आली.

आज बुधवारी सकाळी बाजार उघडताच सोन्याचे भाव १५४५ रुपयाने वाढले तर चांदी ४१२० रुपयाने महाग झाली. आज सोन्याचा दर १,२६,६९०रुपये इतका आहे. तर चांदीचा भाव जीएसटीसह ६२,७४० रुपये आहे.

अमेरिकन डॉलरच्या दरात स्थिरता, सोन्याच्या मागणीत वाढ आणि अमेरिकन सेंट्रल बँक म्हणजेच फेडने डिसेंबरमध्ये पुन्हा व्याजदरात कपात करणार असल्याच्या शक्यतेमुळे बुधवारी सोन्याच्या दरात वाढ दिसून आल्याचे सांगण्यात येतेय.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now