महादेव हॉस्पिटलतर्फे १९ ते २१ नोव्हेंबरपर्यंत अस्थिरोग शिबिराचे आयोजन

नोव्हेंबर 18, 2025 4:42 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२५ । जळगाव शहरातील आकाशवाणी चौक जवळील महादेव हॉस्पिटल येथे उद्या १९, ते २१ नोव्हेंबर या तीन दिवस अस्थिरोग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात अस्थिरोग तज्ज्ञांकडून विविध हाडांच्या तसेच संधिवाताशी संबंधित समस्यांची तपासणी अवघ्या १०० रुपयात करण्यात येणार आहे.

mahadev hospital

शिबिरामध्ये प्रसिध्द अस्थिरोग तज्ञ मणक्याचे आजार, गुडघे, सांधे, हाडांचे विकार, फ्रॅक्चर तसेच क्रीडा दुखापतींसंबंधित तक्रारींची तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये मणका शस्त्रक्रिया, कृत्रिम सांधा प्रत्यारोपण (टोटल हिप/नी रिप्लेसमेंट), गुडघ्याच्या लिगामेंटचे उपचार (एसीएल, टीसीएल), मेनिस्कस समस्या अपघातानंतर होणारे सर्व प्रकारचे फ्रॅक्चर, हात—पायातील हाडांचे तुटणे, गुडघ्याच्या वाटीचे फ्रॅक्चर, बोटांचे फ्रॅक्चर, इम्प्लांट काढणे, तसेच कंबरदुखी, मानदुखी, सांधेदुखी अशा समस्या असलेल्या रुग्णांना शिबिरात विशेष सल्ला दिला जाणार आहे.

या शिबिरात अस्थीरोग तज्ञ डॉ. नरेंद्र शिरसाठ हे तपासणी करणार असून हाडे—सांधे व मणक्याशी संबंधित कोणत्याही तक्रारींसाठी शिबिराचा लाभ घ्यावा आणि तज्ज्ञांकडून योग्य उपचार व मार्गदर्शन करून घ्यावे.शिबिरातील रूग्णांना एम आर आय,सीटीस्कँन व इतर तपासण्या देखिल अत्यल्प दरात उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. अधिक माहितीसाठी डॉ. संस्कृती भिरूड ९५८८४ ७६५९६, प्रो. एन. जी. चौधरी — ९३२५१ ५०००४ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महादेव हॉस्पिटलने नागरिकांना केले आहे हाडे—सांधे व मणक्याशी संबंधित कोणत्याही तक्रारींसाठी शिबिराचा लाभ घ्यावा आणि तज्ज्ञांकडून योग्य उपचार व मार्गदर्शन करून घ्यावे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now