जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती जाहीर करण्यात आली आहे. याबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी bankofindia.bank.in च्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. Bank Of India Recruitment 2025

लक्ष्यात या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १७ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२५ आहे.एकूण ११५ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

ही पदे भरली जाणार?
यामध्ये आयटी, प्रोजेक्ट मॅनेजर, डेटा सायंटिस्ट, एआय डेव्हलपर, लॉ ऑफिसर्स, मॅनेजर सिविल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर पदासाठी भरती जाहीर केली आहे.
शैक्षणिक पात्रता काय?
बँक ऑफ इंडियामधील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी बी.ई/बीटेक कंप्यूटर साइंस/इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स कम्यूनिकेशन किंवा एमसीए/एमएससी/कंप्यूटर साइंस/आईटीमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत त्यांच्याकडे Oracle सर्टिफिकेट असावे.याचसोबत अनुभवदेखील विचारात घेतला जाणार आहे.
२३ ते ४५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे.
इतका पगार मिळणार
बँक ऑफ इंडिया ही सरकारी बँक आहे. सरकारी बँकेतील या नोकरीसाठी तुम्हाला ६४८२० ते १२०९४० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे.












