जळगाव लाईव्ह न्यूज । वृद्ध निवृत्त वडीलांच्या पेन्शनची रक्कम काढण्यासाठी गेलेल्या प्रौढाकडून एटीएममधून पैसे निघत नव्हते. याचा फायदा घेत मागे उभ्या राहिलेल्या तरुणाने हातचालाखी करत एटीएम चोरुन २८ हजार रुपये लंपास केल्याची घटना जळगाव शहरातील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत घडली. याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

गजानन साहेबराव पाटील (वय ५१, रा. राधाकृष्णनगर) हे शेतकरी असून त्यांचे वडील कृषी खात्यातून निवृत्त झाले आहेत. ते गुरुवारी दुपारी सव्वावाजेच्या सुमारास वडीलांच्या बचत खात्यात जमा झालेली पेन्शनची रक्कम काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी बँकेच्या चारही एटीएमवर गर्दी होती. ते पैसे काढत असताना एकदा प्रयत्न करून पैसे आले नाही म्हणून त्यांच्या पाठीमागे रांगेत उभ्या असलेल्या ३० ते २५ वयोगटातील अनोळखी व्यक्तीने त्यांना, असे
बटन दाबा, असा पीन टाका, असे समजावण्याचे नाटक करत त्यांचे एटीएम कार्ड चोरले. थोड्या वेळाने त्यांच्या खात्यातून पैसे काढल्याचा मेसेज त्यांना आला. त्या भामट्याने गजानन पाटील यांच्या वडीलांच्या बँक खात्यातील रक्कम दुसऱ्या एटीएममधून काढल्याचे लक्षात आले.

याबाबत शुक्रवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल भारती देशमुख या करीत आहे. सावरमल जांगीड यांची ज्या पद्धतीने फसवणूक करण्यात आली त्याच पद्धतीने व त्याच कंपनीचे नाव सांगत दोघांनी महेश बनवारीलाल जांगीड आयोध्यानगर) या फर्निचर व्यावसायिकाची ४ लाख ६१ हजार ८५० रुपयांमध्ये फसवणूक केली. त्यांनाही ट्रेडिंगसाठी अॅप डाऊनलोड करण्यास सांगून वेगवेगळ्या ट्रेडिंग ग्रुपमध्ये जुळवून फसवणूक केली. या प्रकरणीही सायबर पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष गोराडे हे करीत आहे.











