जळगाव लाईव्ह न्यूज । ५ नोव्हेंबर २०२५ । लग्नसराईसाठी सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आहे. आज बुधवारी दोन्ही धातूंमध्ये घसरण झाली आहे. सोन्यात घट झाल्याने लग्नसराईत ग्राहकांना मोठा दिलासा मिळालाय.

बुधवारी सराफा बाजार उघडताच पुन्हा एखादा सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली, त्याशिवाय चांदीचे दरही कमी झाले. आज १० ग्रॅम सोन्याची किंमत ९८० रूपयांनी स्वस्त झाले आहे. तर चांदी दरात ५०० रुपयाची घसरण झाली. आजच्या घसरणीनंतर २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १,२१,४८० रूपये इतका आहे. चांदीचा एक किलोचा दर १,५०,५०० रुपये इतका आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दराने नवे उच्चांक गाठले होते. ट्रम्प टेरीफमुळे यंदा २१ एप्रिल रोजी पहिल्यांदा सोने १ लाखांवर गेले त्यानंतर सोने-चांदीचे दर दिवसेंदिवस दराचा विक्रम गाठत दिवाळीच्या सुरुवातीलाच सोने १३५१३६ चा सर्वकालिन उच्चांकावर पोहोचले होते तर चांदीनेही सोन्याला मागे टाकत १५ ऑक्टोबरलाच १,९०,५५० रुपये किलोच्या विक्रमी दरावर पोहोचले होते.
दिवाळीपूर्वीच सोन्याचा विक्रमी पातळीवर पोहोचल्याने त्यामुळे लग्नसराईत सोने खरेदी करायचे की नाही? असा सवाल सर्वसामान्यांना पडत होता. पण लग्नसराईपूर्वी सोन्याच्या किंमतीत घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला.











