NMDC मध्ये नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी ! १९७ पदांसाठी भरती, विनापरीक्षा होणार थेट निवड

ऑक्टोबर 28, 2025 11:29 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । भारत सरकारची कंपनी असलेल्या नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NMDC) मध्ये मोठी पदभरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. NMDC ने अप्रेंटिस पदासाठी ही भरती केली जाणार असून फ्रेशर्ससाठी नोकरीची उत्तम संधी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

NMDC

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना पदानुसार वॉक-इन मुलाखत प्रक्रियेत सहभागी व्हावे लागेल. एनएमडीसीमध्ये ट्रेड अप्रेंटिस, ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या कंपनीत काम करुन तुम्हाला अनुभव मिळणार आहे.यामुळे तु्म्हाला इतर ठिकाणीदेखील नोकरीची संधी मिळेल. जर तुम्ही फ्रेशर्स असाल तर ही संधी सोडू नका. या नोकरीमध्ये ट्रेनिंग पूर्ण केल्यावर तुम्हाला सर्टिफिकेटदेखील मिळणार आहे.

एनएमडीसीमधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २६ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. १९७ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १६ पेक्षा जास्त असावे.

भरतीसाठी पात्रता

ट्रेड अप्रेंटिस पदासाठी मशीनिस्ट, फीटर, वेल्डर, मेकॅनिकल डिझेल, मेकॅनिक मोटर व्हेईकल, इलेक्ट्रिशियनसाठी भरती होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवाराकडे संबंधित ट्रेडमध्ये किंवा आयटीआय सर्टिफिकेट असावे. याचसोबत ग्रॅज्युएट अप्रेंटिस केमिकल इंजियनरिंग, कॉम्प्युटर इंजिनियरिंग, बीबीए, इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग, मायनिंग इंजिनियरिंगमध्ये डिग्री प्राप्त केलेली असावी.

टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी संबंधित क्षेत्रात डिप्लोमा केलेला असावा.ज्यांचे नुकतेच शिक्षण झाले आहे. त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. या नोकरीसाठी वॉक इन इंटरव्ह्यू १२ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. यासाठी तुम्हाला ट्रेनिंग इन्स्टिट्यूट,BIOM, किरनदुल, कॉम्प्लेक्स, जिल्हा दंतेवाडा छत्तीसगड, एनएमडीसी लिमिटेड येथे जावे लागेल. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला NATS आणि NAPS वर अर्ज करा.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now