जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२५ । दिवाळीपूर्वी सोन्यासह चांदी दराने भलीमोठी उसळी घेतल्याने ग्राहकांमध्ये नाराजी होती. मात्र दिवाळीनंतर आता दोन्ही धातूंचे दर घसरताना दिसत आहे. आज सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली.

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर १,१४० रुपयांनी कमी झाले आहेत. आज २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी १,२४,४८० रुपये खर्च करावे लागणार आहे. सोबतच २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरामध्ये १,०५० रुपयांनी घट झाली असून १ तोळाचा भाव आता १,१४,१०० रुपये इतका आहे.

२४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील चांगलीच घट झाली आहे. १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ८६० रुपयांची घट झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९३,३६० रुपये खर्च करावे लागणार आहेत.
सोन्यापाठोपाठ चंदीच्या दराबाबत देखील महत्वाची अपडेट समोर आली आहे. चांदीच्या दरात आज काहीच बदल झाला नाही. आज १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी १५५ रुपये मोजावे लागणार आहेत. तर १ किलो चांदीचे दर १,५५,००० रुपये इतका आहे. चांदीच्या दरात काहीच वाढ न झाल्यामुळे चांदी खरेदी करण्याची देखील आज चांगली संधी आहे.












