जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑक्टोबर २०२५ । धनत्रयोदशीपूर्वी उच्चांकावर पोहोचलेल्या सोन्याच्या दरात मागच्या काही दिवसात घसरण दिसून आली. त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र सोने दरात पुन्हा एकदा वाढ दिसून आली. आज शुक्रवारी, सोन्याने दरात प्रतितोळा ३८० रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे. दुसरीकडे आज चांदी दरात मोठी घसरण झाली आहे.

धनत्रयोदशीपर्यंत सोन्याच्या किमती झपाट्याने वाढत होत्या, जवळजवळ दररोज नवीन शिखर गाठत होत्या. पण दिवाळीत सोन्याचे दर घसरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. मात्र, हे दर आता पुन्हा वाढताना दिसत आहे. दरम्यान दिवाळीनंतर आता लवकरच लग्नसराईचे दिवस सुरु होणार आहे. मात्र त्यापूर्वी सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आगामी दिवसात सोन्याचे दर आणखी वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

२४ कॅरेट सोन्याचे दर
आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात ३८० रुपयांनी वाढ झाली आहे. आज हे दर १, २५,४६० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ३०४ रुपयांनी वाढले आहेत. हे दर सध्या १,००,३६४ रुपये आहेत.
२२ कॅरेटचे दर
आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा ३५० रुपयांनी वाढले आहेत. हे दर सध्या १,१५,००० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे द ९२,००० रुपये आहेत. हे दर ३५० २८० रुपयांनी वाढले हेत.
१८ कॅरेट सोन्याचे दर
आज १८ कॅरेट सोन्याचे दर २८० रुपयांनी वाढले आहेत. हे दर ९४,०९० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर २२४ रुपयांनी वाढले आहेत. हे दर ७५,२७२ रुपये झाले आहेत.
चांदी आणखी स्वस्त..
आज शुक्रवारी चांदी दरात मोठी घसरण झाली आहे. आज चांदी दरात प्रति किलो ३००० हजार रुपयाची घसरण होऊन १,५६,००० रुपयावर पोहोचले आहे.












