जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२५ । दिवाळीपूर्वी उच्चांकी पातळीवर पोहोचल्यानंतर आता सोने आणि चांदीचे दरात घसरण सुरु झाली आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सोने दरात मोठी घसरण झाली आहे. आज २३ ऑक्टोबर २०२५ सर्वत्र दिवाळी आणि भाऊबीज साजरी केली जाणार असून यातच सोन्याचा दर घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

आज गुरुवारी २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ८१० रूपयांची घसरण झाली आहे. यामुळे आता २४ कॅरेट १ तोळं खरेदीसाठी आपल्याला १,२५,०८० रूपये मोजावे लागतील. तर, २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात ८,१०० रूपयांची घसरण झाली आहे.

२४ कॅरेटसह २२ कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ७५० रूपयांची घसरण झाली आहे. २२ कॅरेट १ तोळं खरेदीसाठी आपल्याला १,१४,६५० रूपये मोजावे लागतील.
सोन्यासह चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळत आहे. चांदीच्या दरात १ ग्रॅममागे १ रूपयांची घसरण झाली आहे. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी आपल्याला १५९रूपये मोजानवे लागतील. १किलो चांदीच्या दरात १००० रूपयांची घसरण झाली आहे. १ किलो चांदी खरेदीसाठी आपल्याला १,५९,००० रूपये मोजावे लागतील.












