ग्राहकांना दिलासा! धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने 3000 रुपयांनी घसरले, जळगावमध्ये आता भाव काय?

ऑक्टोबर 18, 2025 11:20 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२५ । धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आहे. जळगाव शहरातील सुवर्ण बाजारात आज सोने दरात तब्बल ३००० रुपये प्रति तोळा इतकी घसरण झाली आहे. आज सोनं खरेदीचा शुभमुहूर्त मानला जातो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत असल्याचं चित्र आहे. परंतु, आज सोन्याच्या दरात कमालीची घट झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला.

gold silver jpg webp

जळगाव शहरातील सराफ बाजारात आज २४ कॅरेट सोने दरात ३००० रुपये प्रति १० ग्रॅम इतकी घसरण झाली आहे. यामुळे २४ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी तुम्हाला आज जीएसटीसह १३२००० रुपये मोजावे लागतील. दुसरीकडे चांदीचा दर प्रति किलो १७४००० रुपये इतका आहे. सोन्याच्या भावात घट झाल्यामुळे सामान्यांना आज सोनं खरेदी करताना नक्कीच दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, सोन्याचे दर गगनाला भिडले असले तरी आज धनत्रयोदशीनिमित्त जळगावच्या सराफ बाजारात सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी दिसून आली. कारण आज धनत्रयोदशीच्या सोन खरेदी करणे शुभ व बरकत देणारे मानल जातो.

या निमित्ताने आज सोन खरेदीसाठी ग्राहक एकवटले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत सोन्यात 52 हजारांची वाढ झाली आहे. या दरवाढीला रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम तसेच अमेरिकेने लादलेल्या टेरिफ धोरणाचा परिणाम देखील होताना दिसून येत आहे. सोन्याचे दर काहीसे कमी झाले असले तरी आगामी काळात सोने दरवाढीची शक्‍यता सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now