गरीब रथ एक्सप्रेसला भीषण आग ; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

ऑक्टोबर 18, 2025 10:43 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२५ । रेल्वेला होणाऱ्या अपघाताच्या घटना वाढताना दिसत असून यातच अमृतसर-सहरसा गरीब रथ एक्सप्रेस ट्रेनमध्ये आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पंजाबमधील सरहिंद स्टेशनजवळ घडली.या दुर्घटनेत एक महिला गंभीर भाजली गेल्याचे वृत्त समोर आले असून रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ट्रेनमध्ये आग लागल्याची घटना समोर येतोच रेल्वेकडून तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले आहे

garib rath fire

बिहारकडे जाणारी ट्रेन क्रमांक 12204 अमृतसर-सहरसा गरीब रथला आज सकाळी अचानक आग लागली. आग लागल्यानंतर ट्रेनमध्ये एकच हाहाकार माजला. लोक सैरवैर धावू लागले. या दुर्घटनेत एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर स्थानिक रूग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सरहिंद रेलवे स्टेशनजवळ धावत्या रेल्वेच्या तीन एसी बोगीमध्ये अचानक आग भडकली. ट्रेन तात्काळ सरहिंद रेलवे स्टेशनवर थांबवण्यात आली अन् कुलिंगचे काम करण्यात आले. शॉर्ट सर्किटमुळे एसी बोगीला आग लागल्याची माहिती समोर आली आहे ही आग त्यानंतर तीन बोगीपर्यंत पसरली गेली. आग लागल्याचं समजताच प्रवाशांमध्ये हाहाकार उडाला. आगीची माहिती रेल्वेला मिळताच मदतकार्य तात्काळ सुरू कऱण्यात आले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now