काय सांगता! फक्त 1 रुपयात महिनाभर अनलिमिटेड कॉल, 2 GB डेटा अन्.. BSNL ची दिवाळी ऑफर वाचा..

ऑक्टोबर 17, 2025 2:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । तुम्हीही सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी BSNL चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. BSNL ने स्वदेशी 4G नेटवर्क लॉन्च केल्यानंतर पहिल्यांदाच ग्राहकांसाठी दिवाळीनिमित्त एक विशेष ऑफर आणली आहे. या योजनेत, केवळ 1 रुपयात ग्राहकांना अमर्याद कॉलिंग, दररोज 2GB डेटा आणि 100 SMS मिळणार आहेत.

bsnl jpg webp

ही योजना 15 ऑक्टोबरपासून सुरू झाली असून, ती 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत लागू राहील. या कालावधीत जर कोणी BSNL नेटवर्कशी जोडला, तर त्याला फक्त 1 रुपयात खालील सुविधा मिळतील. बीएसएनएलमध्ये सामील होऊ इच्छिणाऱ्या कोणालाही फक्त एक रुपयात अमर्यादित कॉल, दररोज २ जीबी डेटा आणि १०० एसएमएस संदेश मिळतील.

कंपनीने या ऑफरला “दिवाळी बोनान्झा” असं नाव दिलं आहे. याआधी स्वातंत्र्यदिनाच्या सुमारास BSNL ने अशाच प्रकारची ऑफर आणली होती, पण त्या वेळी कंपनीचं 4G नेटवर्क भारतभर सुरू झालं नव्हतं. आता मात्र BSNL 4G नेटवर्क देशभरात सक्रिय झालं आहे. कंपनीने सुमारे 98,000 टॉवर्सच्या सहाय्याने सेवा सुरू केल्या आहेत. जर तुमच्या भागात BSNL 4G उपलब्ध असेल, तर तुम्ही या दिवाळीत सरकारी नेटवर्ककडे वळण्याची उत्तम संधी साधू शकता.

BSNL नं एअरटेलला मागे टाकलं

गेल्या काही महिन्यांपासून BSNL आपल्या ग्राहकांसाठी आक्रमक धोरणाने स्पर्धात्मक प्लॅन आणत आहे. TRAI (दूरसंचार नियामक प्राधिकरण) च्या ताज्या आकडेवारीनुसार, BSNL ने नवीन ग्राहक जोडण्यात Airtel ला मागे टाकलं आहे. कंपनीचे अधिकारी सांगतात की, पुढील काही महिन्यांत BSNL आपली 5G सेवा देशभरात सुरू करण्याची तयारी करत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now