Jalgaon Gold Rate : धनत्रयोदशीपूर्वीच सोन्याने पुन्हा नवा उच्चांक गाठला, जळगावात आताचे दर काय?

ऑक्टोबर 16, 2025 4:38 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२५ । दोन दिवसांवर धनत्रयोदशी आली असून या दिवशी अनेक जण सोने खरेदी करतात. मात्र त्यापूर्वीच जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोन्याने पुन्हा नवीन उच्चांक केला. आज गुरूवारी सकाळी बाजार उघडताच २४ कॅरेट सोने दरात प्रति तोळा ४१२ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे जीएसटीसह प्रति १० ग्रॅम सोने एक लाख ३१ हजार ७३७ रूपयांचा नवीन उच्चांक केला. उच्चांकी दरवाढीमुळे धनत्रयोदशीला सोने खरेदीसाठी उत्सुक असलेल्या ग्राहकांच्या उत्साहावर पाणी पडले.

gold

दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या आधी सोन्या-चांदीच्या किमती गगनाला भिडल्या असून, दोन्ही धातूंचे दर सातत्याने नवीन विक्रम प्रस्थापित करत आहेत.अमेरिकन सरकारच्या शटडाऊनमुळे प्रामुख्याने गुंतवणूकदार सोन्यासारख्या सुरक्षित आश्रयस्थानांकडे वळत आहेत. भारत आणि अमेरिकेतील व्यापार संबंधांमधील तणावामुळे देखील सोन्याची मागणी वाढली आहे. अनेक देशांमधील बँका अधिक सोने खरेदी करत आहेत, ज्यामुळे सोन्याच्या किमती वाढतच आहेत.

जळगाव शहरात मंगळवारी (दि १४ ऑक्टोबर) २२६६ रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने सोन्याने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ३० हजार ८१० रूपयांचा उच्चांक केला होता. तर बुधवारी ५१५ रूपयांची वाढ होऊन ते जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ३१ हजार ३२५ रूपयांचा नवीन उच्चांक प्रस्थापित केला होता. मात्र आज गुरूवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा ४१२ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ३१ हजार ७३७ रूपयांचा नवीन उच्चांक केला.

दुसरीकडे आज चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागला. गुरूवारी सकाळी बाजार उघडताच ५१५० रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदी जीएसटीसह प्रति किलो एक लाख ८५ हजार ४०० रूपयांपर्यंत खाली आली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now