जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२५ । एकीकडे दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असताना सोने आणि चांदीच्या दरातील वाढ थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. दोन्ही मौल्यवान धातूंचे दर गगनाला भिडले आहेत. आठवड्याच्या तिसऱ्या व्यापार दिवशी सोन्यासह चांदी दरात मोठी वाढ दिसून आली. आज सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे ५४० रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदी दरात १००० रुपये प्रति किलो वाढ झाली.

सध्या सणासुदीचा काळ सुरू आहे आणि काही दिवसावर दिवाळीची धामधूम साजरी होणार आहे.भारतात लग्नसराई, शुभ प्रसंगी आणि दिवाळीसाठी सोने खरेदी करणे एक परंपरा मानले जाते. सोन्याचा भारतीय संस्कृतीशी सुद्धा जुना संबंध आहे. यंदा मात्र दिवाळीपूर्वीच सोन्यासह चांदीच्या किमतीने लाखांचा टप्पा पार केल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका बसला आहे.

आजचे दर
आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ५४० रुपयांनी वाढले आहेत. हे दर सध्या १,२८,८९० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर १,०३,११२ रुपये आहेत. हे दर ४३२ रुपयांनी वाढले आहेत. आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ५०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर सध्या १,१८,१५० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ९४,५२० रुपये आहेत. या दरात ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा ९६,९७० रुपये आहेत. या दरात ७१० रुपयांनी वाढ झाली आहे. ८ ग्रॅमच्या दरात ५६८ रुपयांनी वाढ होऊन हे दर ७७,५७६ रुपये झाले आहेत.
दुसरीकडे आज चांदी दरात प्रति किलो १००० रुपयाची वाढ होऊन ती १,९०,००० रुपयावर पोहोचली आहे. दरम्यान येत्या काळात सोन्याच्या किमती आणखी वाढू शकतात.












