जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२५ । कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (CBT) बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. यामध्ये ईपीएफओसंबंधित अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले. आता पीएफ खात्यातून पैसे काढणेही सोपे होणार आहे.

या बैठकीत बैठकीत नियम अधिक सोपी आणि सुटसुटीत करणे, ईपीएफमध्ये अंशतः रक्कम काढण्याची सुविधा देणे. विश्वास योजनेतंर्गत याचिका, प्रकरणांचा भार कमी करणे. डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सेवा घरपोच पोहचवणे. ईपीएफओ 3.0 च्या आधुनिकीकरणाला मंजूरी देणे असे बदल करण्यात आले आहे. आतापर्यंत रक्कम काढण्यासाठी वेगवेगळ्या स्थितीसाठी 13 प्रकारचे नियम होते. आता ते तीन सोप्या श्रेणीत वाटले जातील. आजारी, शिक्षण,घर बांधकामासाठी आणि लग्नासाठी ही रक्कम काढण्यात येते.

याआधी फक्त शिक्षण आणि लग्न या दोन गोष्टींसाठी ३ वेळा पैसे काढू शकत होता. आता तुम्ही शिक्षणासाठी १० वेळा तर लग्न खर्चासाठी ५ वेळा पैसे काढू शकतात. याचसोबत मिनिमम सर्व्हिस पीरियड १२ महिने केला आहे.
ऑटोमेटिक सेटलमेंट
आता तुम्ही पीएफच्या कामांसाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही. ईपीएफओची सर्व प्रक्रिया ऑटोमॅटिक होणार आहे. यामुळे तुमचा क्लेम लवकर होईल. फायनल सेटलमेंटची प्रोसेस २ महिन्यांवरुन १२ महिने केली आहे. पेन्शन काढण्याचा कालावधी २ महिन्यांपासून ३६ महिने केला आहे. यामुळे कर्मचारी सोप्या पद्धतीने पैसे काढू शकणार आहेत.
कोणत्याही कारणाशिवाय काढू शकणार पैसे
याआधी नैसर्गिर आपत्ती, साथीचा रोग किंवा बेरोजगारीसारख्या परिस्थितींमुळे पैसे काढण्यासाठी कारण आवश्यक होते. आता ही अट काढून टाकली आहे. आता तुम्ही कोणतेही कारण न देता पैसे काढू शकतात.












