जळगावच्या सुवर्णपेठेत एकाच दिवसात चांदी दरात 11 हजारांची वाढ; नवे दर पाहून चकित व्हाल..

ऑक्टोबर 14, 2025 11:00 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२५ । दिवाळी (Diwali) सण जस-जसा जवळ येत आहे तस-तशी सोने-चांदी (Gold Silver) दरात विक्रमी वाढ होताना दिसत आहे. दरम्यान जळगावच्या (Jalgaon) सुवर्ण बाजारात एकाच दिवसात चांदीच्या भावात ११ हजार रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ८० हजार रुपयांवर पोहोचली. सोन्याच्याही भावात एक हजार ७०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख २४ हजार ७०० रुपयांवर पोहोचले. Gold Silver Rate Today

SL

अवघ्या ५-६ दिवसांवर दिवाळी असून त्यात दिवाळीत सणासुदीच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ असे मानले जाते. त्यामुळे दरवर्षी अनेकजण हा मूहूर्त साधत सोने (Gold Rate) खरेदी करतात. मात्र, यंदा सोन्यासह चांदी दराने उच्चांक गाठला आहे. यात चांदीने २ लाखाकडे झेप घेतली आहे. जळगावच्या सराफ बाजारात मागच्या ४ दिवसात चांदी दरात तब्बल २७ हजाराहून अधिकची वाढ झाली.

९ ऑक्टोबर रोजी चांदी दरात ११,२०० वाढ झाली होती. यांनतर १० ऑक्टोबरला ३००० रुपयाची, ११ ऑक्टोबरला २००० हजराची आणि काल १३ ऑक्टोबर रोजी पुन्हा ११,००० रुपयाची वाढ झाली. यामुळे चांदीचा दर जीएसटीसह १८३३४० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारा तुटवडा व त्यात वाढती मागणी यामुळे चांदीचे भाव झपाट्याने वाढत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now