आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चांदी 5000 रुपयांनी वधारली, सोनेही महागले ; आता नवीन दर काय?

ऑक्टोबर 13, 2025 1:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२५ । या आठवड्याच्या अखेरीस दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे. यंदा दिवाळी तोंडावर सोन्यासह चांदीच्या किमतीने नको तो विक्रम नवी केलाय. मागच्या वर्षीच्या तुलनेत सोन्याचे दर ४०,००० रुपयांनी वाढले आहे. यामुळे दिवाळीपर्यंत सोने आणि चांदी अशीच भरारी घेणार का? असे विचारले जात आहे.दरम्यान आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने दरात प्रति तोळा ३२० रुपये वाढ झालीय. दुसरीकडे चांदी दरात तब्बल ५००० रुपयाची वाढ दिसून असून अशीच दरवाढ राहिल्यास चांदी या आठवड्यातच २ लाखाचा टप्पा गाठू शकतो.

silver

goodreturns वेबसाईट नुसार, आज सोन्याच्या दरात ३२० रुपयांनी वाढ झालेली दिसत आहे. यामुळे आज २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचे दर १,२५,४०० रुपये झाले आहेत. ८ग्रॅम सोन्याचे दर २५६ रुपयांनी वाढले असून हे दर १,००,३२० रुपये झाले आहेत.

आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ३०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,१४,९५० रुपये झाले आहे. १८ कॅरेट सोन्याच्या दरातदेखील चांगलीच वाढ झाली आहे. १ तोळ्यामागे २४० रुपयांनी वाढ झाली आहे. हे दर ९४,०५० रुपये आहेत.

दुसरीकडे चांदीचा दर तब्बल ५००० रुपयांनी वधारला आहे. यामुळे आज चांदी प्रति किलो १,८५,००० रुपयावर पोहोचले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now