वरणगावात दोन गावठी पिस्तुलासह एकाला अटक

ऑक्टोबर 10, 2025 12:51 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२५ । जळगाव जिल्ह्यात आगामी सण-निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून विशेष मोहीम राबविली जात असून याच दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा व वरणगाव पोलिसांनी गुरुवारी रात्री एकाला दोन गावठी पिस्तुलासह अटक केली.

gun

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी येथील राहणारा आणि आधीपासूनच रिकॉर्डवर असलेला आरोपी संजय गोपाळ चंडेले (वय ५०, रा. दर्यापूर शिवार, वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी) हा विनापरवाना शस्त्र बाळगून शहरात फिरत असल्याची माहिती मिळाली. यांनतर वरणगाव शहरातील तिरंगा चौक परिसरात सापळा रचण्यात आला. रात्री ११.३० वाजेच्या सुमारास तिथे झाडाजवळ संशयित इसम उभा असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली

त्याच्या अंगझडतीतून ५०,५०० रुपये किमतीचे २ गावठी पिस्तूल व १ जिवंत काडतूस जप्त केले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या मार्गदर्शनाखाली पो. उ. नि. शरद बागल, रवी नरवाडे, हे.कॉ. गोपाळ गव्हाळे, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, श्रीकृष्ण देशमुख, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे आदींनी केली. वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपास है. कॉ. सुभाष सपकाळ करीत आहेत. आरोपीस दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories