सोने-चांदीच्या किमतीने बुधवारचा उच्चांक मोडीत काढला ; जळगावमधील आताचे दर पहा..

ऑक्टोबर 9, 2025 2:32 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२५ । दिवाळीसारखा सण काही दिवसांवर येवून ठेपला असून मात्र त्यापूर्वी सोने आणि चांदीचे दर दररोज नवनवीन विक्रम मोडीत काढत असताना दिसत आहे. दरम्यान सोन्याच्या दरवाढीचा ट्रेंड कायम राहिल्याने जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या किमतींमध्ये वाढ नोंदवली गेली. सोबतच चांदी देखील महागली आहे. आजच्या दरवाढीनंतर २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर जीएसटीसह २७ हजारापर्यंत जाऊन पोहोचला.

gold

दिवाळीला आपण सोनं हमखास खरेदी करतो. मात्र, वाढत्या सोन्याच्या दरामुळे सोनं खरेदी करावं की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आजही सोन्याच्या दरानं उच्चांकी गाठली आहे. जळगाव शहरातील सुवर्णपेठेत सलग चौथ्या दिवशी सोने दरात वाढ झालीय.

जळगाव सराफ बाजारात बुधवारी २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर विनाजीएसटी १,२२,५०० इतका होता. त्यात आज ५०० रुपयाची वाढ होऊन ते आता १२३००० (जीएसटी १२६६९०) रुपयावर पोहोचले. तसेच आज २२ कॅरेट सोने प्रति तोळा विनाजीएसटी १,१२,६७० इतका आहे.

दुसरीकडे चांदी दरात आज मोठी वाढ दिसून आली. बुधवारी चांदीचा एक किलोचा दर १,५३,५०० इतका होता. तो १५०० रुपयांनी वाढून १,५५,००० रुपयांवर पोहोचला. तर जीएसटी चांदीचा दर १,५९,६५० रुपयावर पोहोचला.

दरवाढी मागचं कारण काय?

सणासुदीचा हंगाम सुरू झाल्याने विशेषतः धनतेरस आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तवली जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा काही घटक सोन्याच्या उच्चांकी दरवाढीला कारणीभूत ठरले आहेत. अमेरिकन सरकारच्या शटडाऊनची शक्यता आणि फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरांमध्ये कपात होण्याच्या अपेक्षेमुळे गुंतवणूकदारांचा कल पुन्हा सोन्याकडे वाढल्याचे बोलले जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now