जळगाव जिल्ह्यात खुनांच्या मालिका थांबेना ! किरकोळ वादातून तरूणाचा खून

ऑक्टोबर 6, 2025 8:51 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑक्टोबर २०२५ । जळगाव जिल्ह्यात खुनांच्या मालिका थांबण्याचे नाव घेत नसून यात किरकोळ वादातून होणाऱ्या खुनाच्या घटना वाढतच असल्याचं दिसत आहे. अशीच घटना भुसावळच्या कंडारीत घडली असून यात किरकोळ वादातून जळगावच्या तरूणाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक समोर आली आहे. जितेंद्र राजेंद्र साळुंखे (वय ४०, रा. गेंदालाल मिल परिसर, जळगाव) असं खून झालेल्या तरुणाचं नाव असून या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली.

jitendra salunkhe

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र साळुंखे हा जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात पत्नी, तीन मुलांसह राहत होता. हातमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान, जळगावच्या माजी महापौरांचा मुलगा व इतर दोघांसोबत जितेंद्र हा भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे एका कामानिमित्त गेला होता. तिथे एका हॉटेलवर मद्यपान केल्यानंतर चौघांमध्ये वाद सुरू झाले. वादातून हाणामारी झाली. यानंतर जितेंद्र याला इतर तिघांनी धारदार शस्त्राने वार करून जागीच संपवले.

जितेंद्रला खासगी रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी व रुग्णालयात पोहचले. जितेंद्र यांचा मृतदेह सरकारी रुग्णालयात हलवण्यात आला आहे. याबाबत फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांनी सांगितले की, आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक होईल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories