जळगाव लाईव्ह न्यूज । तुम्हीही जर तुमच्या मुलांना कफ सिरप प्यायला देत असाल तर ही बातमी नक्की वाचा.. कफ सिरपबाबत समोर आलेल्या माहितीने पालकांची चिंता वाढवली आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये अलिकडेच झालेल्या बालकांच्या मृत्यूचे कारण खोकल्याच्या कफ सिरप या औषधीमुळे झाल्याची माहिती समोर आलीय. आतापर्यंत १२ लहान मुलांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती हाती आली आहे.

लहान मुलांना सर्दी आणि खोकला झाल्यानंतर कफ सिरप पाजलं. मात्र, पुढील काही दिवसांत या लहान मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीये. कफ सिरप पिऊन मृत्यूमुखी पडलेले सर्व लहान मुले ५ वर्षाखालील होती. या लहान मुलांना ताप आणि सर्दीचा त्रास झाला होता. त्यानंतर स्थानिक डॉक्टरांनी त्यांना खोकल्याचं औषध दिलं.

खोकल्याचं हे औषध प्यायल्यानंतर या लहान मुलांची तब्येत बिघडली. काही दिवसांनी या लहान मुलांचं लघवी करण्याचे प्रमाण कमी झालं. पुढील काही दिवसांत या लहान मुलांची किडनी फेल झाली. याआधी ६ लहान मुलांचा मृत्यू झाला होता. मात्र, या प्रकरणात आकडा वाढतच चालला आहे.
प्रशासनाने सुरुवातीला पाणी आणि उंदराचे नमुने घेतले होते. मात्र, त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. राजस्थानमध्ये कफ सिरपमुळे ३ मुलांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही राज्यात मिळून १२ मुलांचा मृत्यू झाला आहे.
ही घटना घडल्यानंतर प्राथमिक चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीतून कफ सिरप तयार करणाऱ्या कंपन्यांनी बनावट कफ सिरप तयार केल्याचे समोर आहे. धक्कादायक म्हणजे वाहनांच्या निर्मितीत वापरले जाणारे रसायन या कफ सिरपमध्ये वापरण्यात आल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रातर्फे कफ सिरप जमा करण्यात आले आहेत. लहान मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर राजस्थान सरकारने मुख्यमंत्री मोफत औषध वाटप योजनेअंतर्गत कफ सिरपचे वाटप थांबवले आहे. तर मध्यप्रदेशमधील छिंदवाडा येथे दोन ब्रँडच्या कफ सिरपवर बंदी घालण्यात आली आहे.











