महाराष्ट्र शासनाच्या नोकरीची सुवर्णसंधी; 903 पदांसाठी भरती, पगार 63200 मिळेल

ऑक्टोबर 3, 2025 4:10 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ ।महाराष्ट्र शासनाची सरकारी नोकरी मिळविण्याची उत्तम संधी आहे. महाराष्ट्र सरकारच्या भूमी अभिलेख विभागात मोठी पदभरती जाहीर करण्यात आलीय. विशेष या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

Bhumi Abhilekh Bharti

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या भरतीसाठी https://ibpsreg.ibps.in/gomsep25/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. लक्ष्यात असू द्या या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2025 निश्चित करण्यात आलीय. या भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 19900/- ते 63200/- रुपये पगार मिळेल. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करावा.

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावविभाग/प्रदेश पद संख्या
1भूकरमापक पुणे प्रदेश83
कोकण प्रदेश, मुंबई259
नाशिक प्रदेश124
छ. संभाजीनगर210
अमरावती प्रदेश117
नागपूर प्रदेश110
Total 903
शैक्षणिक पात्रता: (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा) किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (सर्वेक्षक) (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 24 ऑक्टोबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : अमागास प्रवर्ग : ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-]
पगार : रु 19900/- ते 63200/-
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीइथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now