जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२५ । साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सोन-चांदीसह अनेक महत्त्वाच्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. दरम्यान, या शुभमुहूर्तावर जळगाव शहरातील सराफा बाजारात सोने खरेदीची लगबग दिसून आली. परंतु यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने-चांदीचे दर आकाशाला भिडले आहेत. जर तुम्हीही आज सोने-चांदी खरेदीला जात असाल तर त्यापूर्वी आताचे दर काय आहेत ते जाणून घ्या..

दसऱ्याच्या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. सोन्याच्या दराने दसऱ्याच्या एक दिवस आधी सार्वकालीन उच्चांकी पातळी गाठली असून चांदीनेही दराचा आतापर्यंतचा विक्रम काल मोडीत काढला आहे.

सोन्याचा काय आहे भाव?
आज गुरुवारी सकाळच्या सत्रात २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १ लाख ७ हजार ४५०, तर २४ कॅरेट सोने १ लाख १७ हजार ३०० आहे. GST सह हे दर १ लाख २१ हजार ५०० रुपये आहेत. दुसरीकडे चांदीने एक लाख ५१ हजार ४१० रूपयांचा नवीन उच्चांक प्रस्थापित केला.
दरम्यान, सोन्याच्या दरात झालेली ही वाढ, ग्राहकांसाठी मात्र काहीशी अडचणीची आणि अधिक खर्चिक ठरत आहे. मात्र, तरीही ग्राहक शुभ मुहूर्त साधत सणासुदीला नक्कीच सोनं खरेदी करतात. हा साडेतीन मुहूर्तांपैकी सोनं खरेदीचा उद्याचा एक चांगला मुहूर्त आहे, त्यामुळे सोनं खरेदीलाही चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास सराफ बाजारातील विक्रेत्यांना आहे.
मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी सोन्याच्या दरात भरघोस वाढ झाली आहे. मागच्या वर्षी सोन्याचे दर ७६ हजार रुपये आहे. आज हे दर जवळपास १ लाख २१ हजार रुपये झाले आहेत. दरम्यान, चांदीच्याही दरात वाढ झाली आहे. मागच्या वर्षी १ किलो चांदीची किंमत ९३००० रुपये आहे, यावर्षी हे दर १ लाख ५१ हजार रुपये आहे. या दरात खूप जास्त वाढ झाली आहे.












