जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२५ । नवरात्रीचे औचित्य साधून रेडिओ ऑरेंज (धमाल) 106.4 एफएम तर्फे ‘दांडिया धमाल’ या भव्य कार्यक्रमाचे करण्यात आले आहे. हा दांडिया धमाल कार्यक्रम आज २९ रोजी जळगाव शहरातील यश लॉन्स येथे होणार आहे.

तरुणाईसह सर्व वयोगटांसाठी हा कार्यक्रम खास आकर्षणाचा ठरणार असून नवरात्रीतील ही दांडिया धमाल जळगावच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांसाठी विविध आकर्षक बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. तसेच फूड कोर्टमध्ये विविध खाद्यपदार्थांचा आस्वादही घेता येणार आहे,

नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक दांडिया व गरब्याचे सूर, आकर्षक रोषणाई, रंगीबेरंगी वेशभूषा आणि उत्साहाने भारलेले वातावरण जळगावकरांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे. या ‘दांडिया धमाल’ कार्यक्रमाच्या अधिक माहिती साठी किरण परदेशी – 80104 99625 व आर जे मयूर – 89592 47964 यांना संपर्क साधावा.
कार्यक्रमात या नामांकित संस्थांचा सहभाग
कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर म्हणून कलर्स मराठी, दैनिक पुण्यनगरी व कंटेंट ओशन इन्फोटेक प्रा.लि. सहभागी झाले आहेत. तसेच, ज्वेलरी पार्टनर – पातोंडेकर ज्वेलर्स आणि व्हेन्यू पार्टनर – यश लॉन्स व हॉल आहेत. या रंगारंग दांडिया नाईटचे असोशिएट पार्टनर्स म्हणून श्री व्यकंटेश रिफायनरिज लि., चौधरी टोयोटो, भास्कर मसाले, एस के ऑईल, श्री किचन ट्रॉली, सिका मोटार्स व शोभाराम फाऊंडेशन या नामांकित संस्थांचा सहभाग आहे.
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये
आकर्षक डेकोरेशन, रोषणाई व आधुनिक साउंड सिस्टीम
पारंपरिक वेशभूषेला विशेष प्रोत्साहन
बेस्ट ड्रेस व बेस्ट डान्सरसाठी बक्षिसे
फूड कोर्टमध्ये विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद












