जळगावातील घरफोडीचा छडा; 36 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, चौघांना अटक

सप्टेंबर 26, 2025 7:08 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२५ । जळगाव शहरात आणि जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून घरफोडीच्या घटना सातत्याने घडत आहे. याच दरम्यान रामानंद नगर पोलिसांनी एका घरफोडीचा छडा लावत चौघांच्या मुसक्या आवळल्या. चोरट्यांकडून तब्बल 310 ग्रॅम सोने आणि 250 ग्रॅम चांदीसह 36 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे इतर दोन घरफोडी आणि एक दुचाकी चोरीचा असे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. अशी माहिती पोलीस अधीक्षक महेश वर रेड्डी यांनी दिली आहे.

jls

नेमका काय आहे प्रकार?

जळगाव शहरातील मोहाडी रोड, पार्वतीबाई काळे नगर येथील नरेंद्र बाध हे बाहेरगावी गेले असताना 15 मे ते 1 जून या कालावधीत त्यांच्या बंद घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली होती. यावेळी चोरट्यांनी घरातून 357 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 250 ग्रॅम वजनाची चांदीची भांडी व दागिने आणि 85 हजार रुपये रोख रक्कम तसेच डीव्हीआर, वायफाय मॉडेल असा एकूण 36 लाख 83, हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. याबाबत 1 जून रोजी लिलाधर शांताराम खंबायत यांनी रामानंद नगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.

या गुन्ह्याचा तपास करत असताना 19 सप्टेंबर रोजी रात्रीच्या गस्तीवर असताना सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांच्या पथकाला दोन इसम संशयीत रित्या फिरताना आढळले. पाठलाग करून त्यांना पकडण्यात आले. सखोल चौकशीत त्यांनी मोहाडी रोड येथील घरफोडीची कबुली दिली. आरोपी रवि प्रकाश चव्हाण (वय 21, रा. तांबापूरा) आणि शेख शकील शेख रफीक (वय 30, रा. रामनीगंज) यांना अटक करण्यात आली.आरोपींच्या माहितीवरून त्यांचे साथीदार जनंद उर्फ मस्तकीम भिकन शहा आणि गुरुदयालसिंग मनजित टाक यांनाही 20 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली.

तपासादरम्यान, आरोपींनी सोने-चांदीचे दागिने सुरत व जामनेर येथे विकल्याचे कबूल केले. त्यानुसार रामानंद नगर पोलिसांनी वेगाने कारवाई करत, चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 33 लाख 83 हजार किमतीचे 310 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 250 ग्रॅम चांदीची लगड असा ऐवज हस्तगत करण्यात यश मिळवले. या यशस्वी कामगिरीमुळे रामानंद नगर पोलीस ठाण्यात सह इतर दोन घरफोडी आणि एक दुचाकी चोरीचा असे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now