जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेबर २०२५ । जागतिक बाजारातील घडामोडीमुळे भारतात सोने आणि चांदी दरात प्रचंड वाढ झाली आहे. एन सणासुदीच्या तोंडावर दोन्ही धातूंनी विक्रमी उच्चांक गाठला असून यामुळे ग्राहकांना मात्र सोने खरेदी करावे की नाही असा प्रश्न पडला आहे. दरम्यान आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

दरम्यान, आज २० सप्टेंबरला सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे ८२० रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे आता २४ कॅरेट सोन्याचे दर १,१२,१५० रुपये प्रति तोळा आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ६५६ रुपयांनी वाढले असून हे दर ८९,७२० रुपये आहेत. आज २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे ७५० रुपयांनी वाढ झाली आहे. हे दर १,०२,८०० रुपये आहेत. ८ ग्रॅममागे ६०० रुपयांची वाढ होऊन हे दर ८२,२४० रुपये आहेत.

दरम्यान जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदी दराने मोठी उसळी घेतली आहे. मागच्या गेल्या नऊ महिन्यात सोन्याच्या दरात तब्बल ३१ हजाराहून अधिक रुपयाची तर चांदीच्या दरात ४० हजार रुपयांपेक्षा अधिकची वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यात सोन्याचे दर ७८ हजार ५०० रुपये प्रति तोळा आणि चांदीचा दर ८९ हजार ५०० रुपये प्रति किलो एवढे होते. नऊ महिन्यापासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचं दिसून येत आहे.












