GST कपातीनंतर टीव्हीएस स्पोर्ट बाईक किती स्वस्त होईल? घ्या जाणून..

सप्टेंबर 11, 2025 3:46 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ सप्टेंबर २०२५ । दिवाळीपूर्वी केंद्र सरकारने देशातील नागरिकांना मोठी भेट दिली आहे. ती म्हणजेच २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार आहे. सरकारने १२ आणि २८ टक्के स्लॅब बंद केले आहेत. आता बहुतेक वस्तू ५ आणि १८ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये येतील. यामध्ये वाहनांच्या किमती देखील कमी होणार आहे. GST कपातीनंतर देशातील लोकप्रिय बाईक टीव्हीएस स्पोर्टच्या किमती देखील कमी होतील. जीएसटी सुधारणांनुसार, ३५० सीसी पर्यंतच्या बाइक्सवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी केला जाऊ शकतो. जीएसटी कपातीनंतर टीव्हीएस स्पोर्ट किती स्वस्त होईल ते जाणून घेऊया?

tvs bike

टीव्हीएस स्पोर्ट बाईकवर किती बचत होईल?

सध्या, टीव्हीएस स्पोर्टची सुरुवातीची किंमत ५९,९५० रुपये एक्स-शोरूम आहे, ज्यावर २८ टक्के जीएसटी लागू आहे. जीएसटी २२ टक्क्यांवरून १८ टक्के कमी केल्यानंतर, त्याची किंमत सुमारे १० टक्क्यांनी कमी केली जाईल. यानंतर, बाईकची किंमत फक्त ५५,००० रुपये एक्स-शोरूम असेल, कारण ग्राहकांना थेट ५,००० रुपये वाचणार आहेत.

टीव्हीएस स्पोर्ट बाईक दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. त्याच्या बेस व्हेरिएंट स्पोर्ट सेल्फ स्टार्ट अलॉय व्हील्सची दिल्लीमध्ये ऑन-रोड किंमत सुमारे ७२,००० रुपये आहे. त्याच्या टॉप व्हेरिएंट स्पोर्ट सेल्फ स्टार्ट अलॉय व्हील व्हेरिएंटची ऑन-रोड किंमत सुमारे ८६ हजार रुपये आहे.

टीव्हीएस स्पोर्ट्स बाईकचा मायलेज

टीव्हीएस स्पोर्ट बाईकबद्दल, कंपनीचा दावा आहे की ही बाईक प्रति लिटर ७० किमी पेक्षा जास्त मायलेज देते. यात टेलिस्कोपिक फोर्क आणि ट्विन शॉक अ‍ॅब्झॉर्बर आहे. या बाईकचा टॉप स्पीड ताशी ९० किमी पेक्षा जास्त आहे. बाजारात ही बाईक हिरो एचएफ १००, होंडा सीडी ११० ड्रीम आणि बजाज सीटी ११० एक्सशी स्पर्धा करते. हिरो एचएफ १०० मध्ये ९७.६ सीसी इंजिन आहे, जे कंपनीने अपडेट केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now