सर्वसामान्यांसाठी गुडन्यूज ! १० दिवसांत या १५ वस्तू होणार स्वस्त; घ्या जाणून एका क्लीकवर

सप्टेंबर 9, 2025 11:19 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ सप्टेंबर २०२५ । यंदाच्या दिवाळीआधीच केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट मिळणार आहे. कारण २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार आहे. आता फक्त दोनच जीएसटी स्लॅब असणार आहेत. त्यामुळे अनेक जीवनावश्यक गोष्टींच्या किंमती कमी होणार आहे. यामध्ये तेल, शॅम्पू आणि साबणापासून ते कपडे- चप्पल आणि अन्नपदार्थांवरील टॅक्स कमी होणार आहे. दरम्यान, कोणकोणत्या गोष्टी स्वस्त होणार, यामधून सर्वसामान्य नागरिकांना किती फायदा होणार ते जाणून घेऊया.

GST

चपाती, कपडे आणि घरांच्या किंमती कमी होणार

जीएसटी टॅक्स स्लॅबमध्ये बदल केल्यानंतर निर्मला सितारामन यांनी सांगितले की, टॅक्स स्लॅबमधील बदल सर्वसामान्य नागरिक ते शेतकरी आणि लहान व्यापाऱ्यांना लक्षात घेऊन करण्यात आले आहेत.याबाबत सांगितले की, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू टीव्ही, फ्रिज, पॉवरबँक, मोबाईल, चार्जर, कूलर यांच्यावरील टॅक्स कमी करण्यात आला आहे. तसेच घरात उपयोगी वस्तू चपातीपासून ते कपड्यावरील टॅक्स कमी केला जाणार आहे.

तेल शॅम्पूवरील टॅक्स कमी

सरकारने तेल आणि शॅम्पूवरील कर १८ टक्क्यांवरुन ५ टक्के केला आहे. त्यामुळे जर शॅम्पू जर १०० रुपयांचा असेल तर त्यावर १८ टक्के जीएसटी लागू केला तर त्याची किंमत १८ रुपये होती. त्यामुळे तो शॅम्पू ११८ रुपयांना मिळायचा. त्याची किंमत १०५ रुपये मिळाला आहे.

बिस्कीटांवरील टॅक्स कमी

दरम्यान, अन्नपदार्थांवरील टॅक्स कमी झाला आहे. नमकीन- बिस्कीटांवरील टॅक्स ५ टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे तर ५ रुपयांच्या बिस्कीटावर टॅक्स ६० पैसे टॅक्स लागत होता. तर त्यावर आता १५ पैसे टॅक्स लागणार आहे.

दूध-पनीरवर शून्य टक्के जीएसटी

दूध, पनीरवर शून्य टक्के जीएसटी लागू करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हाला या गोष्टींवर तुम्हाला कोणताही टॅक्स भरावा लागणार आहे.

तूप स्वस्त होणार

डेअरी प्रोडक्ट्सच्या किंमती स्वस्त होणार आहेत. तूप आणि बटरवरील जीएसटी दर ५ टक्के करण्यात आला आहे. याआधी हा दर १२ टक्के होता.

पिझ्झा-ब्रेडवर ५ टक्के जीएसटी

फूड प्रोडक्ट्समध्ये पिझ्झा- ब्रेडवर जीएसटी कमी करण्यात आला आहे. यावर ५ टक्के जीएसटी लागू करण्यात आला आहे.

चॉकलेट- मिठाईंवरील टॅक्स कमी

चॉकलेट- मिठाईंवरील टॅक्सदेखील कमी करण्यात आला आहे. यावरील जीएसटी दर १८ टक्क्यांवरुन ५ टक्के करण्यात आला आहे. यामुळे चॉकलेट आणि मिठाईंवरील टॅक्स कमी होणार आहे.

कपड्यांवरील टॅक्स कमी

कपड्यांवरील टॅक्सदेखील कमी करण्यात आला आहे. २५०० रुपयांपर्यंतच्या कपड्यांवर म्हणजेच साडी, शर्ट, ट्राउजरवरील जीएसटी दर ५ टक्के करण्यात आले आहे.

शूजवरील टॅक्स कमी

२५०० रुपयांपर्यंतच्या सर्व चप्पलांवर आणि शूजवरील टॅक्स कमी केला आहे. यावर आधी १२ टक्के जीएसटी होता. तो आता ५ टक्के करण्यात आले आहे. आधी २००० रुपयांच्या शूजवर २४० रुपये टॅक्स लागत होता हा आता फक्त १४० रुपये लागणार होता.

शिक्षणासंबंधित वस्तूंवरील टॅक्स

सरकारने शिक्षणासंबंधित वस्तूंवरील टॅक्स कमी केला आहे. यामध्ये वह्या, पुस्तके, पेन्सिल, रबर, कटर या वस्तूंवरील टॅक्स रद्द करण्यात आला आहे. यावर आधी १२ टक्के जीएसटी लागू होत होता.

इलेक्ट्रॉनिक्स वस्तू

एसी, टीव्हीपासून ते वॉटर हिटर या गोष्टी स्वस्त होण्याची शक्यता आहे. एसीवरील टॅक्स २८ टक्क्यांवरुन १८ टक्के करण्यात आला आहे. तर डिशवॉशर, मॉनिटर, प्रोजेक्टरवरील टॅक्स १२ टक्क्यांवरुन १२ टक्क्यांवरुन ५ टक्के करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now