जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीच्या वतीने जिल्हा परिषद समोर दिनांक 19 पासून काम बंद आंदोलन सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज जिल्हा परिषद पासून ते कलेक्टर ऑफिस पर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये 600 ते 700 अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते घोषणाबाजी देऊन कलेक्टर ऑफिस समोर रॅली घेण्यात आली व माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.

बेमुदत काम बंद आंदोलन कशासाठी
जुलै 2022 मध्ये औरंगाबाद खंडपीठाने निकाल दिला ज्यांना दहा वर्षे सेवा झाली असेल राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत त्यांना शासन सेवेत समायोजन करण्यासाठी.
याच निकालाच्या आधारावर 13 मार्च 2024 रोजी शासनाने शासन निर्णय पारित केला सलग दहा वर्ष सेवा झालेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांना शासन सेवेत समायोजन करून घेण्याबाबत.
परंतु 17 महिने उलटल्यानंतरही या शासन निर्णयाची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही याबद्दल राज्य संघटनेने वारंवार पाठपुरावा केलेला आहे मागील महिन्यामध्ये अधिवेशन काळामध्ये दहा वाकरा जुलै रोजी आझाद मैदानावर दोन दिवसाचे लक्षणे आंदोलन केले होते.
या आंदोलनात एक महिन्याची मुदत देण्यात आली होती परंतु तरीदेखील कोणतेही ठोस भूमिका न घेतल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बेमुदत काम बंद करण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे.













