अबब..! सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी जळगावच्या सुवर्णपेठेत सोने-चांदीची उसळी, आताच भाव वाचा..

सप्टेंबर 1, 2025 3:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२५ । एकीकडे सणासुदीचे दिवस सुरु झाले असताना जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या किमतीने ऐतिहासिक पातळी गाठली. ज्यामुळे ग्राहकांसह व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. आज नवीन आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सकाळी बाजार उघडताच सोन्यासह चांदी किमतीत मोठी वाढ झालीय. सोने प्रति तोळा ११०० रुपयांनी तर चांदी तब्बल ३ हजार रुपये प्रति किलोने महागली आहे. यामुळे सणासुदीत सोने आणि चांदी खरेदीचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांच्या अपेक्षेवर पाणी फिरलं आहे. Gold Silver Rate Today

GS 1st September

आजचा सोन्याचा दर? Gold Rate Today

ट्रम्प टॅरिफच्या भीतीमुळे काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमती सतत वाढत आहेत. सोमवारी देखील सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ दिसून आली. आज जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी १ लाख ४ हजार ६०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली आहे. तर जीएसटीसह हा दर १ लाख ७ हजार ७३८ रुपयांवर पोहोचले आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर ९५ हजार ८१५ (जीएसटी ९८६८९) रुपये प्रति तोळा इतका आहे.

चांदीचा दर | Silver Rate Today

सोण्यापाठोपाठ चांदी दराने देखील मोठी उसळी घेतलीय. आज सकाळच्या सत्रात चांदी दरात तब्बल ३ हजार रुपयाची वाढ दिसून आली. यानंतर चांदीचा एक किलोचा दर १ लाख २४ हजारावर पोहोचली आहे. तर जीएसटीसह चांदी १ लाख २७ हजार ७२० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. दरम्यान जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासातले सोन्याने चांदीचे आजचे दर हे सर्वाधिक असल्याचं सराफ व्यावसायिक यांनी म्हटलं आहे.

दरवाढीचे कारण काय?

एकीकडे गणेशोत्सव सुरु असून आगामी नवरात्री, दसरा आणि दिवाळी सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. मात्र त्यापूर्वी सोने आणि चांदीच्या दराने ऐतिहासिक पातळी गाठली. दरवाढीमागील मुख्य कारण म्हणजे रूपयाचे ऐतिहासिक नीचांकी स्तरावर घसरलेले मूल्य. रुपया कमजोर झाल्यानंतर आयात खर्च वाढल्याने दोन्ही धातुंच्या किमती दररोज नवीन उच्चांक गाठताना दिसत आहेत. देशांतर्गत बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ दिसून येत आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे रूपयाचे ऐतिहासिक नीचांकी स्तरावर घसरलेले मूल्य. रुपया कमजोर झाल्यानंतर आयात खर्च वाढल्याने दोन्ही धातुंच्या किमती दररोज नवीन उच्चांक गाठताना दिसत आहेत.याशिवाय, अमेरिकेने जाहीर केलेल्या ५० टक्के आयात शुल्क, जागतिक बाजारपेठेकडून सकारात्मक संकेत मिळाल्याने विशेषतः गुंतवणूकदारांचा सुरक्षित गुंतवणूक साधनांमध्ये कल वाढला आहे. ज्यामुळे देखील सोने आणि चांदीच्या किंमत वाढीला चालना मिळाल्याचे सांगितले जात आहे.

भंगाळे गोल्डच्या स्वर्णकन्या योजनेमुळे मुलीच्या लग्नासाठी सोनं खरेदीचं टेन्शन संपलं!

दरम्यान, जळगाव शहरातील नामांकित भंगाळे गोल्डतर्फे स्वर्णकन्या योजना सुरु करण्यात आली आहे. स्वर्णकन्या योजना ही मुलीच्या लग्नासाठी किंवा सुरक्षित गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ठरू शकते. या योजनेत ग्राहकाला दर महिन्याला ठराविक रक्कम भरून २२ कॅरेट किंवा २४ कॅरेट सोने खरेदी करण्याची सुविधा मिळते. या योजनेची खास वैशिष्ट्ये म्हणजे ग्राहकाने ११ महिने ठराविक रक्कम भरल्यानंतर १२व्या महिन्यात दागिने घेतल्यास त्यावर घडणावळ लागत नाही म्हणजे, १००% मजुरीमुक्त! या योजनेत ग्राहकांना अन्य फायदेही होतात. जसे की, दर महिन्याला वेगवेगळ्या दराने सोने खरेदी केल्यामुळे सोन्याच्या भावातील चढ-उताराचा फायदा ग्राहकाला मिळतो. जमा झालेल्या वजनाएवढे दागिने मजुरीविना घेता येतात. अधिक दागिने घ्यायचे असल्यास फक्त अतिरिक्त सोन्यावर मजुरी द्यावी लागते. अधिक माहितीसाठी 9169164441 या व्हाट्सअप नंबरवर संपर्क साधावा.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now