अरे बापरे! जळगावमध्ये गेल्या २४ तासात सोने १२००, चांदी ४५०० रुपयांनी वधारली

ऑगस्ट 31, 2025 11:24 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । एकीकडे सणासुदीचे दिवस सुरु झाले असताना सोने आणि चांदीच्या किमतीने दराने मोठी उसळी घेतली असून दराने ऐतिहासिक उच्चांकी गाठली आहे. जळगावच्या सराफा बाजारात गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात १२०० हजार रूपयांनी तर चांदीच्या दरात तब्बल ४५०० रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे सणासुदीत सोने आणि चांदी खरेदीचा प्लॅन करणाऱ्या गाहकांच्या अपेक्षेवर पाणी फिरलं आहे.

gold rate 2

शनिवारी सोन्याच्या भावात एक हजार २०० रुपयांची वाढ होऊन ते जीएसटीविना १ लाख ४ हजार रुपयांवर पोहोचले. तसेच चांदीच्या भावात ४५०० रुपायांनी वाढून ते जीएसटीविना १ लाख २३ हजार रुपयापर्यंत पोहोचली.

जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासातले सोन्याने चांदीचे आजचे दर हे सर्वाधिक असल्याचं सराफ व्यावसायिक यांनी म्हटलं आहे. टेरीफ रेटमुळे डॉलरच्या किमतीवर परिणाम झाला आहे, तर तर फेडरल बँकेच्या बैठकीनंतर व्याजदर कमी होण्याची शक्यता असल्याने याचा परिणाम सोन्याने चांदीच्या दरावर झाल्याचं सराफ व्यावसायिक यांचं म्हणणं आहे.

सोन्या आणि चांदीच्या वाढत्या दरामुळे ग्राहकांवर देखील त्याचा मोठा परिणाम झाला आहे. सोन्या चांदीचे खरेदी आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिलेले नसून हौस कशी पूर्ण करायची असा सवाल महिला ग्राहकांनी उपस्थित केला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now