भीषण अपघात ! भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत सहा जण ठार

ऑगस्ट 30, 2025 3:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२५ । महाराष्ट्रात अपघाताच्या प्रचंड वाढल्या आहे. दररोज या घटनांमध्ये वाढ होताना दिसत असून यात अनेकांना जीवावर मुकावे लागले आहे. याच दरम्यान आता बीडमधून भीषण अपघाताची घटना समोर आलीय. ज्यात भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत चौघांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला तर दोघेजण उपचारादरम्यान मृत पावले.

dhule solapur highway accident

बीड येथील दिनेश दिलीप पवार (रा.माऊली नगर बीड), पवन शिवाजी जगताप (रा.अंबिका चौक बीड), अनिकेत रोहिदास शिंदे (रा.शिदोड ता.बीड), किशोर गुलाब तोर (बाभूळतारा ता.गेवराई), आकाश अर्जुन कोळसे (रा.रिलायन्स पंप परिसर बीड), विशाल श्रीकिसन काकडे वय 22 रा. शेकटा ता.शेगाव) हे पायी चालत पेंडगाव येथे मारुतीरायाच्या दर्शनासाठी जात होते.

बीड ते पेंडगाव असा पायी प्रवास करत असताना धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील नामलगाव येथील उड्डाणपूल पास करून पुढे असलेल्या एसआर जीनिंगजवळ चालत असताना पाठीमागून भरधाव आलेल्या कंटेनरने सहाही जणांना चिरडले.

यात चौघांचा जागीच तर दोघांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. कंटेनरच्या दोन चालकांना बीड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलिसांनी ताब्यात घेतले. अपघातातील मृतदेह जिल्हा रुग्णालयात असून या घटनेने जिल्हा हळहळला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now