सरकारने भाकरी फिरविल्या! भंडाऱ्याच्या पालकमंत्रीपदावरुन संजय सावकारेंची उचलबांगडी

ऑगस्ट 26, 2025 10:44 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑगस्ट २०२५ । महायुती सरकारने अचानक भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आधी संजय सावकारे (Sanjay Savkare)भंडाऱ्याचे पालकमंत्री होते. पण आता ही जबाबदारी पंकज भोयर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. भंडाऱ्याचे पालकमंत्री बदलल्याचा शासन आदेश सोमवारी रात्री राज्याचे उपसचिव दिलीप देशपांडे यांनी काढला आहे. दरम्यान, या निर्णयामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या असून संजय सावकारे यांचे डिमोशन का करण्यात आले, याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, संजय सावकारे यांच्यावर आता बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

sanjay savkre 1

राज्याचे वस्त्र उद्योगमंत्री संजय सावकारे यांच्याकडे भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र आता सरकारने संजय सावकारेंची अचानक पालकमंत्रीपदावरुन उचलबांगडी केली.

संजय सावकारे यांचा मतदारसंघ जळगाव जिल्ह्यातील भुसावळ असून त्यांना भंडारा जिल्ह्यापर्यंत येणं हा लांबचा प्रवास ठरत होता. ते झेंडा टू झेंडा म्हणजे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला भंडारा जिल्ह्यात यायचे. काही स्थानिक भाजप नेते त्यांच्यावर नाराज होते अशी सुद्धा माहिती आहे.

तसेच डीपीडीसीच्या बैठकीमध्ये ते यायचे. मात्र, इतर दैनंदिन प्रशासनिक कामाकडे त्यांचा दुर्लक्ष व्हायचे. त्यामुळे शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांची जिल्ह्यात हळूहळू ताकद वाढायला लागली होती. त्यामुळे भंडारा जिल्ह्याची जाण असणाऱ्या जवळच्या जिल्ह्यातील मंत्र्यांना पालकमंत्री करावा, अशी अशी सातत्याने केली जात होती. त्यामुळेच वर्धा जिल्ह्याचा पालकमंत्री पद सांभाळणारे भाजपचे पंकज भोयर यांच्याकडे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे बोलले जात आहे.

तसच पुढच्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यामुळे प्रशासनावर पकड असणं सुद्धा तितकच महत्वाच आहे, त्या दृष्टीकोनातून सुद्धा भंडाऱ्याचे पालकमंत्री बदलण्यात आले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now