जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२५ । आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीपूर्वी काँग्रेस पक्षाला एकामागून एक धक्के बसताना दिसत आहे. काँग्रेसच्या अनेक नेते पदाधिकाऱ्यांनी सत्तेत असलेल्या महायुतीच्या घटक पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. अशातच आता काँग्रेस पक्षातील बडा नेत्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

राहुल पाटील, राजेश पाटील आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. यामुळे आगामी निवडणुकींपूर्वी कोल्हापुरात काँग्रेसला जोरदार धक्का असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढला आहे. यावेळी राहुल पाटील यांनी काँग्रेस पक्षातील नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली.मागील निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक फेरबदल झाले.

माझे वडील पी.एन.पाटील आणि माझ्या मातोश्री गेल्या. पवार साहेबांनी, पवार कुटुंबीयांनी धीर दिला. पण काहींना आमची आठवण देखील झाली नाही, असे राहुल पाटील म्हणाले. अशा काळात अजित दादा तुम्ही आम्हाला हात दिला. तुम्ही खंबीर साथ दिल्याने आजचा हा कार्यक्रम संपला आहे.
ज्या पद्धतीने पी एन पाटील यांनी एका विशिष्ट विचारसरणीने काम केले, एका घराण्यावर निष्ठा ठेवली, त्याच पद्धतीने आम्ही आपल्यासोबत प्रामाणिकपणे राहणार. इथून पुढे माझ्यासोबत आणि माझ्या कार्यकर्त्यांसोबत दादा तुम्ही नेहमी सोबत रहा’, असे वक्तव्य केले.












