काय बॅटरी, काय कॅमेरा..! Redmi Note 15 Pro लाँच, फोनची किंमत किती?

ऑगस्ट 24, 2025 1:30 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । Xiaomi ची Redmi Note 15 Pro मालिका लाँच झाली आहे. कंपनीने या मालिकेतील दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. त्यात Note 15 Pro आणि Note 15 Pro+ चा समावेश आहे. दोन्ही हँडसेट उत्तम कॅमेरा आणि शक्तिशाली बॅटरीसह येतात. त्यांना 7000mAh बॅटरी, जलद चार्जिंग, रिव्हर्स चार्जिंग आणि शक्तिशाली प्रोसेसर मिळतो

Redmi Note 15 Pro

स्मार्टफोनची किंमत किती?

Redmi Note 15 Pro+ ची सुरुवातीची किंमत १८९९ युआन (सुमारे २३ हजार रुपये) आहे, जी १२ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी आहे. १२ जीबी रॅम + ५१२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २०९९ युआन (सुमारे २५ हजार रुपये) आणि १६ जीबी रॅम + ५१२ जीबी स्टोरेज व्हेरिएंट २२९९ युआन (सुमारे २८ हजार रुपये) आहे. नोट १५ प्रो ची किंमत १३९९ युआन (सुमारे १७ हजार रुपये) पासून सुरू होते आणि हा फोन चार रंगांमध्ये आणि तीन कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहे. भारतात या फोनची लाँच तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

Redmi Note 15 Pro+ स्मार्टफोनचे वैशिष्ट्ये

Redmi Note 15 Pro+ Hyper OS 2 वर चालतो, जो Android 15 वर आधारित आहे. यामध्ये 6.83-इंचाचा वक्र डिस्प्ले असून 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो, तसेच स्क्रीनसाठी Xiaomi ड्रॅगन क्रिस्टल ग्लासचा वापर केला आहे. कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाले तर Note 15 Pro+ मध्ये ५०MP मेन लेन्स, ५०MP टेलिफोटो लेन्स आणि ८MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे, तर समोर ३२MP सेल्फी कॅमेरा आहे. या फोनमध्ये ७०००mAh बॅटरी असून ९०W वायर्ड चार्जिंगचा पर्याय आहे.

त्याचवेळी, Note 15 Pro मध्ये MediaTek Dimensity 7400 Ultra प्रोसेसर, ५०MP + ८MP ड्युअल रिअर कॅमेरा आणि २०MP फ्रंट कॅमेरा आहे. या फोनमध्ये देखील ७०००mAh बॅटरी आहे, पण याची चार्जिंग क्षमता ४५W पर्यंत आहे. ही नवी रेडमी नोट १५ सीरीज शक्तिशाली हार्डवेअर आणि मोठ्या बॅटरीसह स्मार्टफोन प्रेमींमध्ये आकर्षण वाढवण्यास तयार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now