मी प्रमोद महाजन नाही, याची मला जाणीव, पण.. ; राऊतांच्या टीकेचा मंत्री गिरीश महाजांनी घेतला समाचार

ऑगस्ट 20, 2025 5:37 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर टीकास्त्र सोडताना दिसत आहे. याच दरम्यान, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली होती. गिरीश महाजन हे प्रमोद महाजन नव्हेत. ते प्रमोद महाजन होऊ शकत नाहीत, अशी टीका संजय राऊतांनी केली होती. त्यांच्या टीकेला गिरीश महाजन यांनी प्रत्त्युत्तर दिल आहे.

girish mahajan sanjay raut jpg webp

मंत्री महाजन म्हणाले, मी प्रमोद महाजन नाही, याची मला जाणीव आहे. आम्ही प्रमोद महाजन होऊ शकत नाही, मात्र प्रमोद महाजन यांना अपेक्षित असलेले यश भाजपला मिळावे यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत.

देशभरात भारतीय जनता पक्षाला अनुकूल असे वातावरण निर्माण होते आहे. देशातील मतदार भाजपसोबत आहे. गेल्या विविध निवडणुकांमध्ये हे दिसून आले आहे. विरोधी पक्ष मात्र अजूनही त्याचा बोध घेण्यास तयार नाही. आपला पराभव लपविण्यासाठी विरोधक खोटे आरोप करण्यात व्यस्त झाले आहेत.

देशभरात भगवामय वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत न भूतो न भविष्यती अशी स्थिती सर्व नागरिक अनुभवतील. जिल्हा परिषद, महापालिका आणि अन्य निवडणुकांमध्ये विरोधकांनी कितीही प्रयत्न केला तरीही त्यांना सत्ता मिळण्याची शक्यता नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now