जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२५ । जळगाव शहराबाहेरून जाणाऱ्या तरसोद फाटा ते पाळधी दरम्यानच्या १३ किमीचा बायपास पूर्ण झाला असून उदघाटनापूर्वीच तीन दिवसांपासून अवजड वाहतुकीला मार्ग खुला करत बायपासची एका बाजूने वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे आता शहरातून जाणाऱ्या महामार्गाला मोकळा श्वास घेता येऊ लागला आहे. शहरातून होणारी अवजड वाहतक कमी झाली आहे.

पाळधी ते तस्सोद रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होते. या मार्गावरच्या उजव्या बाजूने वाहतूक सुरू झाली आहे. डाव्या बाजूचा रस्ताही तयार झाला आहे. पाळधी आणि आसोदा रेल्वे उड्डाणपुलावर काम सुरू असल्याने हा मार्ग मात्र वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. पंधरवड्यात या पुलांवरच्या रस्त्याचे काम पूर्णत्वास आल्यानंतर दोन्ही बाजूंनी वाहतूक खुली होणार आहे. यामुळे जळगाव शहरातील अवजड वाहनांची वाहतूक कमी होणार आहे.

दरम्यान, भुसावळ, धुळे, चोपडा, यावल, छत्रपती संभाजीनगर, अमळनेरकडे जाणान्य वाहनचालकांना आता शहरातील महामार्गावरून जाण्याची गरज नाही. आता त्यांना बायपास’ थेट त्यांच्या प्रवासाच्या रस्त्यापर्यंत नेणार आहे. ‘बायपास’ सेवेत दाखल झाल्याने शहरातील महामार्गावरून जाणारी अवजड वाहतूक ३० टक्के कमी झाली आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी झाली.
तुम्हाला कुठे जायचे ?
धुळे व भुसावळकडून येणाऱ्या वाहनचालकांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी ‘सुवर्ण’वाटा उपलब्ध झाल्या आहेत.
सेवारस्ता – कुठे जाता येणार?
१) तरसोद – खेडी, एमआयडीसी, अयोध्यानगर, छत्रपती संभाजीनगर
२) आसोदा शनिपेठ, शिवाजी नगर, जुने जळगाव.
३) ममुराबाद – शनिपेठ, जुने जळगाव, टॉवर चौक.
४) कानळदा – शिवाजीनगर, के. सी. पार्क, खोटे नगर
५) भोकनी – बांभोरी, टहाकळी, फुलपाट, चांदसर
६) पाळधी – विद्यापीठ, बांभोरी
७) महामार्ग – खोटे नगर, पिंप्राळा, मानराज पार्क, शिवकॉलनी, कोल्हेनगर,












