जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२५ । भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आशिया कप २०२५ साठी टीम इंडियाची घोषणा केली. ज्यात सूर्यकुमार यादव याच्याकडे टीम इंडियाची धुरा असेल तर शुभमन गिल याला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर सारख्या स्टार फलंदाजांना संघात स्थान देण्यात आलेले नाही. याशिवाय जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा, अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांना संघात स्थान मिळाले आहे.

आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर 28 सप्टेंबरला महाअंतिम सामना होणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघांना 4-4 नुसार विभागण्यात आलं आहे. प्रत्येक संघ साखळी फेरीत आपल्या गटातील 3 संघांविरुद्ध प्रत्येकी 1 सामना खेळणार आहे. त्यानंतर दोन्ही गटातील अव्वल 2 संघ सुपर 4 साठी पात्र ठरतील. त्यानंतर अव्वल 2 संघांमध्ये महाअंतिम सामना होईल. टीम इंडिया गतविजेता आहे. त्यामुळे भारतासमोर यंदा आशिया कप ट्रॉफी राखण्याचं आव्हान असणार आहे.

8 संघ आणि 2 गट
अ गट : भारत, पाकिस्तान, ओमान आणि यूएई
ब गट : बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग
आशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघ :
सूर्यकुमार यादव (कॅप्टन), शुबमन गिल (उपकर्णधार) अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), हर्षित सिंह राणा आणि रिंकू सिंह.
राखीव खेळाडू : यशस्वी जैस्वाल, रियान पराग, प्रसिध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेल.












