जळगाव लाईव्ह न्यूज । लेवा पाटीदार समाजाचा शैक्षणिक बक्षिस समारंभ १५ ऑगस्ट रोजी समता भ्रातृ मंडळ, पिंपरी चिंचवडला पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रगीत म्हणण्यात आले व गणेश वंदना नंतर पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.


बाल गोपाळांसाठी दहीहंडीचा कार्यक्रम घेण्यात आला व सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आला. या कार्यक्रमाला २०० पेक्षा अधिक मुलांचा सत्कार करून त्यांना बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक विलास छगन बोरोले, डॉ. प्रा. आशिष पाटील, डॉ. प्रा. लीना चौधरी, डॉ. प्रा. निवृत्ती नारखेडे, मा. सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके, उद्योजक अनिल परतणे, उद्योजक के एल नारखेडे, संस्थापक अध्यक्ष .भागवत चौधरी व मंडळाचे अध्यक्ष हेमंत श्रीरंग झोपे, उपाध्यक्ष दिगंबर महाजन, उपाध्यक्षा सौ. रेखा भोळे, सचिव रवींद्र बऱ्हाटे, खजिनदार सुरेश फेगडे व मंडळाची कार्यकारणी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी मंडळाचे पदधिकारी, तसेच स्वीकृत सदस्यांनी व कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम घेतले.


मंडळाच्या वतीने पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. मुलांना डॉ. प्रा.आशिष पाटील, डॉ.प्रा.लीना चौधरी, डॉ. प्रा.निवृत्ती नारखेडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. नंतर पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत मुलांचा सत्कार समारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे अन्नदाते श्री. विलास बोरोले साहेब व सौ. संगीताताई बोरोले यांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष श्री.हेमंत श्रीरंग झोपे व सौ. प्रीती हेमंत झोपे यांनी केला. तसेच मंडळाचे अध्यक्ष श्री. हेमंत झोपे यांनी दरवर्षीचे देणगीदार / आर्थिक आधारस्तंभ यांचे सत्कार करून आभार मानले. मंडळाचे अध्यक्ष यांनी प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले व शैक्षणिक देणगीसाठी पालकांना आवाहन केले. थोडक्यात मंडळाच्या कार्यक्रमाची माहिती दिली. मंडळांच्या कार्यक्रमांमुळे समाज एकत्र येत आहे. आपल्या मनोगतात सांगितले.
या शैक्षणिक कार्यक्रमाला पालक व मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पुनम चौधरी व डॉ. निनाद वायकोळे यांनी केले. आभार प्रदर्शनाचे काम श्री. सचिन चौधरी यांनी केले.












