जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२५ । जर तुमचे देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँक एचडीएफसी (HDFC) बँकेत खाते असेल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे एचडीएफसी बँकेकडून कॅश ट्रान्झॅक्शन, रोख व्यवहारांपासून ते चेकबुक च्या अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे. यामुळे थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे! नेमके कोणते नियम बदल करण्यात आले ते जाणून घेऊया..

RTGS ट्रान्सफर शुल्क
२ लाख ते ५ लाख रुपयांवर २० रुपये शुल्क भरावे लागणार आहे तर ५० लाखांपेक्षा जास्त रुपयांवर ४५ रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

रोख व्यव्हारांच्या नियमांत बदल
आता प्रत्येक खात्यावर पहिले चार व्यव्हार मोफत असणा आहे. त्यानंतरच्या व्यव्हारांवर शुल्क आकारले जाणार आहे.
४ पेक्षा जास्त वेळा व्यव्हार केले तर प्रत्येक व्यव्हारामागे १५० रुपये द्यावे लागणार आहे.
थर्ड पार्टी ट्रान्झॅक्शनवर दिवसभरासाठी मर्यादा २५००० रुपये निश्चित करण्यात आली आहे.
फंड ट्रान्सफरच्या नियमांत बदल
चेकबुकच्या नियमात बदल
आता सेव्हिंग अकाउंटवर १० पानांचे चेकबुक मोफत मिळणार आहे. याआधी २५ पानांचे चेकबुक मोफत मिळत होते. त्यानंतर अतिरिक्त पानांसाठी ४ रुपये आकारले जाणार आहेत.याचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार आहे.
NEFT ट्रान्सफर शुल्क
आता तुम्हाला १०,००० रुपयापर्यंत ट्रान्झॅक्शन करायचे असेल तर २ रुपये शुल्क भरवे लागेल. १० हजार ते १ लाख रुपयांसाठी ४ रुपये शुल्क, १ लाख ते २ लाखांसाठी १४ रुपये आणि २ लाखांपेक्षा जास्त २४ रुपये शुल्क भरावे लागणार आहे.












