जळगावकरांसाठी आणखी एक गुडन्यूज ! वंदे भारतनंतर ‘ही’ नवीन ट्रेन उद्यापासून धावणार, थांबे अन् वेळापत्रक घ्या जाणून..

ऑगस्ट 6, 2025 10:56 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२५ । जळगाव आणि भुसावळमार्गे पुणे-अजनी (नागपूर)दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे वंदे भारत १० ऑगस्टपासून धावण्याचे संकेत असून यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अशातच जळगावकरांसाठी आणखी एक खुशखबर आहे. प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कोइम्बतूर-जयपूर-कोइम्बतूरदरम्यान विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष या गाडीला जळगाव आणि भुसावळला थांबा असणार असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांची सोय झाली आहे.

New train

कोइम्बतूर- जयपूर वेळापत्रक

गाडी क्रमांक ०६१८१ कोइम्बतूर-जयपूर विशेष गाडी ७ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान दर गुरुवारी कोइम्बतूर येथून पहाटे २:३० वाजता सुटेल आणि जयपूर येथे शनिवारी दुपारी १:२५ वाजता पोहोचेल. दरम्यान ही ट्रेन दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दुपारी १ वाजून ३५ मिनिटाने भुसावळ स्थानकावर पोहोचेल. तर जळगावला दुपारी २ वाजून १० मिनिटाने पोहोचले.

जयपूर-कोइम्बतूर वेळापत्रक

गाडी क्रमांक ०६१८२ जयपूर-कोइम्बतूर विशेष गाडी १० ऑगस्ट ते ७ सप्टेंबरदरम्यान दर रविवारी रात्री १०:०५ वाजता सुटेल आणि कोइम्बतूर येथे बुधवारी सकाळी ८.३० वाजता पोहोचेल. ही ट्रेन दुसऱ्या दिवशी सोमवारी संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटाने जळगावला पोहोचले, तर रात्री ८ वाजून ५ मिनिटाने भुसावळ स्थानकावर पोहोचेल.

या स्थानकांवर असणार थांबा?

या गाडीला तिरुपूर, इरोड, सालेम, जोलारपेट्टी, काटपाडी, रेणुगुंता, कडापा, येरगुंतला, गुटी, ढोणे, करनूल सिटी, गडवाल, मेहबूबनगर, काचीगुडा, कामारेड्डी, निजामाबाद, बासर, मुदखेड, हजूर साहिब नांदेड, पूर्णा, हिंगोली डेक्कन, वाशिम, अकोला, भुसावळ, जळगाव, नंदुरबार, उधना, भरूच, वरोदरा, गोधरा, रतलाम, जावरा, मंदसोर, निमच, चितोरगढ, चंदेरिया, भिलवाडा, बजरंगनगर, नाशिराबाद, अजमेर आणि किशनगढ या ठिकाणी थांबे आहेत.

या विशेष गाड्यांमध्ये वातानुकूलित, स्लीपर आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे मिळून १८ डब्बे असतील.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now