जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जुलै २०२५ । गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत चढ-उतार होत असताना दिसून आले. गेल्या आठवड्यात सोन्याने विनाजीएसटी १ लाख रुपयावर विक्रमी दर गाठल्यानंतर दरात घसरण दिसून आली. यामुळे ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला. मात्र आज सोने दरात मोठी वाढ दिसून आलीय. सोबतच चांदी दरातही वाढ झालीय. आजच्या दरवाढीने सोन्याचा दर पुन्हा एक लाखाच्यावर गेला आहे. यामुळे खरेदीचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांना कालच्या किमतीपेक्षा आज जास्त पैसे मोजावे लागणार आहे.

आज सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली. goodreturns नुकसार आज ३० जुलै २०२४ रोजी सोन्याचा दर ६६० रुपये प्रति तोळा वाढला आहे. यामुळे आता २४ कॅरेट १० ग्रॅम सोने खरेदीसाठी तुम्हाला १००४८० रुपये मोजावे लागणार आहे. तर १० तोळे सोन्याचा दर १०,०४,८०० रुपये इतका आहे

तर आवाज २२ कॅरेट सोन्याचा दर ६०० रुपयांनी वाढून १० ग्रॅम सोने ९२,१०० रुपयावर गेला आहे. तर १० तोळे सोन्याचा दर ९,२१,००० रुपये इतका आहे. जर आपण चांदीबद्दल बोललो तर, आज चांदीचा दर १००० रुपये प्रति किलोने महागली आहे. यामुळे आता चांदी दर १,१७,००० रुपये प्रति किलो आहे. .
बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे की अमेरिकेतील व्यापार करार आणि जागतिक आर्थिक घडामोडींमुळे सोने आणि चांदीच्या किमतीत हा बदल दिसून येत आहे. याशिवाय, गुंतवणूकदार मध्यवर्ती बँकांच्या चलनविषयक धोरणांवरही लक्ष ठेवून आहेत, ज्यामुळे बाजारात अस्थिरता आहे.












